पद्मशाली सोशल फाऊंडेशन मायेची ऊब देत आहे - सौ. शिवानी लक्षेट्टी
नगर - थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. थंडीपासुन बचाव करण्यासाठी स्वेटर, ब्लँकेट व इतर ऊबदार कपडे वापरतात. परंतु आजही समाजामध्ये काही गरजु व कष्टकरी लोकांना थंडीपासुन बचावासाठी ऊबदार कपडे घेण्याची आर्थिक परिस्थिती नसते. अशाच गरजु ,कष्टकरी व वंचित लोकांना मदत व्हावी, म्हणुन जे कार्य करीत आहेत, ते कार्य मायेची ऊब देणारे आहे, असे प्रतिपादन सौ. शिवानी लकशेट्टी यांनी केले.
पद्मशाली सोशल फाऊंडेशनच्यावतीने श्री मार्कंडेय शैक्षणिक संकुल येथे 60 कष्टकरी व गरजु महिलांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी सौ.लकशेट्टी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन रामदास अण्णा सुंकी, मार्गदर्शक गणेश लकशेट्टी, फाऊंडशेचे अध्यक्ष रोहित गुंडू, सचिव अजय लयचेट्टी, प्रकाश कोटा, रविंद्र लकशेट्टी, सौ.सुरेखा लकशेट्टी, सौ.लक्ष्मीे बुरा उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे रामदास सुंकी म्हणाले, थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची मदत घ्यावी लागते,परंतु काही लोकांना तेही मिळत नसल्याने त्यांच्या नशिबी कडाक्याच्या थंडीत कुडकूडणेच येते. समाजातील अशाच काही वंचीत, गरजु, दिव्यांग महिलाना माणुसकी धर्म जोपासण्याच्या हेतूने पद्मशाली सोशल फाऊंडेशन वतीने थंडीपासून बचाव व्हावी म्हणून ब्लँकेट वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. फाऊंडेशनचे कार्य हे तरुणांना चांगली दिशा देईल, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात फाऊंडेशनचे श्रीनिवास बुरगुल म्हणाले की, गेल्या 6 वर्षापासून पद्मशाली सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातुन विविध सामाजिक उपक्रम राबवुन समाजामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. आम्ही जे कार्य सुरु केले आहेत ते लोकांपर्यंत पोहचल्यामुळे आज समाजातील दानशुर व्यक्ती मदतीसाठी पुढे येत आहे. त्यातुनच आम्ही विविध सामाजिक उपक्रम फाऊंडेशनच्या माध्यमातुन राबवित आहोत. थंडी पासून बचाव करण्यासाठी 60 कष्टकरी व गरजु महिलांना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम करण्यात आल्याचे सांगुन पुढील वर्षभर राबविण्यात येणार्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी समाजबांधव व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश लकशेट्टी, अमोल गाजेंगी, अजय लयचेट्टी, शुभम सुंकी, श्रीनिवास बुरगुल, अमित सुंकी, वरद लकशेट्टी, आकाश अरकल, विशाल द्यावपेल्ली, मयुर कल्याणम, संतोष गुंडू, मयुर जिंदम, बालाजी कोक्कुल, राजु तडका, प्रशांत कोक्कुल, गणेश अवधुत,श्रीनिवास कोडम, श्री मुनगेल, यशवंत सुंकी, श्रीनिवास कोडम, रविराज चिट्याल, कु.श्रावणी लकशेट्टी, कार्यक्रम संपल्यानंतर लकशेट्टी परिवाराच्यावतीने सर्वांना अल्पोपहार देण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीनिवास बुरगुल यांनी केले. तर आभार शुभम सुंकी यांनी मानले.
Post a Comment