नगर - प्रभाग क्र.9 क चे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश तिवारी यांच्या प्रचाराचा शुभारंभ सर्जेपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शहरप्रमुख संभाजी कदम, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, सभापती अविनाश घुले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, प्रा.माणिक विधाते, धनंजय जाधव, आरिफ शेख, गणेश कवडे, सचिन शिंदे, संजय शेंडगे, प्रशांत गायकवाड, अभिजित खोसे, दगडू पवार, गौरव ढोणे, अरविंद शिंदे, दिपक सूळ, रामचंद्र दिघे, रवी चव्हाण, कैलास शिंदे, सारंग पंधाडे, निर्मला धुपधरे, छाया तिवारी, अरुणा गोयल, दिपक कावळे आदिंसह राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी आ.संग्राम जगताप म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे, त्यामुळे येणार्या प्रत्येक निवडणुकीत स्थानिक पातळीवर आघाडीचाच उमेदवार असणार असून, तो निवडून येण्यासाठी तिन्ही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते काम करणार आहेत. नगर महानगरपालिकेत महाविकास आघाडीचीच सत्ता असल्याने या माध्यमातून सुरु असलेले कामांमुळे प्रभाग 9 मधील आघाडीच्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.
यावेळी भाऊ कोरगांवकर म्हणाले, नगर महानगरपालिकेत महाविकास आघाडीच्या महापौर आहेत, ही महाविकास आघाडी मजबूत असून, सर्वांच्या समन्वयातून शहराच्या विकासात मोठे योगदान देत आहेत. शहराच्या विकासासाठी राज्यसरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून शहरातील विकास कामे मार्गी लागत आहे, त्यामुळे नागरिकांची महाविकास आघाडीला पाठिंबा असल्याने या पोट निवडणुकीतील उमेदवार सुरेश तिवारी हे निश्चित विजय होतील, असा विश्वास व्यक्त केला.
उमेदवार सुरेश तिवारी म्हणाले, आपण नगरसेवक पदाच्या काळात प्रभागाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे, नागरिकांच्या कायम संपर्क राहून नागरिकांचे कामे मार्गी लावली आहेत. आता महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या प्रभागातून निवडणूक लढवत असून, या आघाडीचे सर्व कार्यकर्ते आपल्या पाठिशी असल्याचे विजय आपलाच होणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी संभाजी कदम, धनंजय जाधव, प्रा.माणिक विधाते आदिंनी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुरेश तिवारी यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सर्जेपुरा भागातून प्रचारफेरी काढण्यात आली.
Post a Comment