इस्लामपूर : (वार्ताहर)य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील खरातवाडी, बहे,हूबालवाडी,येडेमचिंद्र या कारखाना कार्यक्षेत्रातील गावातील ऊस तोडणी कामगारांना जिवनावश्यक वस्तूंच्या किट चे वाटप कारखान्याचे संचालक श्री. अविनाश खरात (बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली खरातवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच पृथ्वीराज खरात.समाजिक कार्यकर्ते विठ्ठल खरात यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सुरेश वाटेगावकर.
रीटायर फौजी हणमंत खरात तसेच गटाधिकारी विकास कदम स्लिप बाॅय दिलावर पटेल व ग्रामस्थ उपस्थित होते.
अवकाळी व अतिवृष्टी च्या पाऊसाने ऊस तोडणी कामगारांची अत्यंत गैरसोय होत असल्याने कारखान्याचे वतीने हा नाविन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे .
यामुळे परिसरातील कामगार व शेतकरीवर्ग यांच्यात समाधानाचे वातावरण असुन या विभागातील सर्वजण संचालक मंडळाचे अभिनंदन व कौतुक करताना दिसत आहेत.
Post a Comment