उपचारा अभावी कोणत्या रुग्णांचा मृत्यू झाल्यास गाठ मनसेशी नितीन भुतारे यांचा मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन ईशारा
अहमदनगर मधील सिव्हील हॉस्पिटलमध्ये आग लागून त्यामध्ये 14 जणांचा होरपळून रुग्णांचा मृत्यू झाला त्या घटनेला जवळपास एक महिना उलटून गेला आहे परंतु आज देशात व ओमायक्राँन या आजाराचे चे रुग्ण आढळून येत आहेत सरकार एका बाजूला सांगत आहे की कोरोणा व्हेरियांट ओमायकक्रॉन तिसरी लाट येणार परंतु अहमदनगर मधील सिविल हॉस्पिटल ला लागलेल्या आगीमुळे त्यानंतर फायर ऑडिट चे काम तीन आय सी यू विभागात सुरू झाल्यामुळे फायर यंत्रणा बसविण्यासाठी फायर सेफ्टी बसविण्याकरिता जवळपास काही महिन्यांचा अवधी लागणार असल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील तीनही आयसीयू आज बंद आहेत एकही व्हेंटिलेटर बेड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शिल्लक नाही जर यदाकदाचित भविष्यात व ओमायकक्राँन ची तिसरी लाट आली रुग्णांना व्हेंटिलेटर ची गरज भासली तर व्हेंटिलेटर बेड मिळाला पाहिजेत अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे सर्वसामान्य गोरगरीब जनता यांना मोफत उपचार मिळावा याकरिता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रुग्ण येतात उपचार घेतात परंतु आज महात्मा फुले जन आरोग्य योजने द्वारे जर रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेड उपचार करिता मिळणार नसतील तर गोरगरीब जनता खाजगी हॉस्पिटलमध्ये जाणार नाही त्यांच्याकडे डीपॉझिट , बील भरण्याकरिता हजोरो, लाखो रुपये नाहीत त्यामुळे त्यांना त्यांना उपचार देखील मिळणार नाहीत त्यामुळे सरकारने या गंभीर प्रकरणाची ताबडतोब दखल घेऊन खाजगी हॉस्पिटलमधील आय सी यू व्हेंटिलेटर बेड ताब्यात घ्यावेत खाजगी हॉस्पिटल मधील त्या आय सि यु बेड वर आत्तापासूनच महात्मा फुले जन आरोग्य योजने द्वारे मोफत उपचार करावेत ताब्यात घ्यावेत व जे काही रुग्ण आजही येतात त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजने द्वारे मोफत उपचार उपलब्ध करून द्यावेत
ओमायक्राँन चे रुग्ण सापडल्या नंतर सरकारला अहमदनगर सिविल हॉस्पिटल मधील फायर ऑडिट करण्याची आठवण झाली आहे फायर सेफ्टी यंत्रणा बसविण्याची आठवण झाली आहे का? असा प्रश्न नितीन भुतारे यांनी मुख्यमंत्री यांना केला आहे.
झोपलेले पालकमंत्री आणि आरोग्य मंत्री यांच्यामुळे आज गोरगरीब असेदिवसअहमदनगरमध्येसहनकरावेलागतआहे. यांच्या निष्क्रिय कारभारामुळेच जनतेला सिव्हील हॉस्पिटलमध्ये आय सी यू बेड आज मिळत नाही त्यामुळे आपण ताबडतोब दखल घेऊन लवकरात लवकर आय सी यू बेड उपलब्ध करावेत.
ओमायक्रॉन चे रुग्ण अहमदनगरच्या बॉर्डर येऊन ठेपले आहेत. पिंपरी-चिंचवड व पुण्यामध्ये जवळपास आठ रुग्ण ओमायकक्रॉनचेअसल्यामुळे अहमदनगर जिल्ह्याला दक्ष राहिले पाहिजेत त्यामुळे कोणत्याही रुग्णांचा बेड अभावी उपचाराअभावी मृत्यू होणार नाही याची काळजी आपण घ्यावी अन्यथा असे काही झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार आपण राहाल याची नोंद घ्यावी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे काही झाले तर कदापि सहन करणार नाही त्यावेळेस होणाऱ्या उद्रेकाला आपन सामोरे जावे त्यावेळी सरकारची गाठ ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राहील जनतेच्या आरोग्यासाठी जनतेच्या हितासाठी जनतेच्या सुरक्षेसाठी जनतेच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत राहणार नाही याची देखील नोंद घ्यावी असा ईशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
Post a Comment