नगर - आज देशातील नंबर एकचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे पाहिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशाचा विकास साधत आहे. या विकासाचे भागिदार होणाचे कार्य आपणा सर्वांवर आहे. केंद्र सरकारच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी व या योजनांचा लाभ संबंधितांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. बुथ स्तरावर विविध जबाबदारीचे पालन कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. बुथ स्तरावरील काम योग्य पद्धतीने झाले तर निवडणुक जिंकणे सोपे होते. पक्ष वाढीसाठी जे-जे आवश्यक आहे, त्याबाबत आपणास वरिष्ठ पातळीवर मार्गदर्शन व ताकद देण्याचे काम करण्यात येईल. नगरमध्ये शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असून, आता त्यात कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग देऊन शहरात भाजपा नंबर एकचा पक्ष करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजपाचे प्रभारी मनोज पांगारकर यांनी केले.
भाजपाच्या नगर शहर जिल्हा संघटनात्मक आढावा बैठकीचे उद्घाटन प्रभारी मनोज पांगारकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र उर्फ भैय्या गंधे, भाजप कार्यकारिणी सदस्य प्रा.भानुदास बेरड, अॅड. विवेक नाईक, तुषार पोटे, महेश नामदे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अजय चितळे, शिवाजी दहिंडे, नरेंद्र कुलकर्णी, रविंद्र बारस्कर, लता शेळके, संगीता खरमाळे, मनेष साठे, संतोष गांधी, सुवेंद्र गांधी, डॉ.ज्ञानेश्वर दराडे, अनिल सबलोक, वसंत राठोड, जगन्नाथ निंबाळकर, महेश तवले, विशाल खैरे आदि उपस्थित होते.
भैय्या गंधे म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा विचारांवर चालणार पक्ष आहे. भाजपाने कार्यकर्त्यांना नेहमीच पाठबळ देण्याचे काम केले आहे. पक्षातील कार्य पाहून पदाची संधीही दिली जाते, त्यामुळे अनेक कार्यकर्ते पक्षाशी जोडले जात आहे. केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ संबंधितांपर्यंत पोहचविण्यासाठी शहरातील विविध शाखांच्यावतीने उपक्रम राबविले जात असल्याने कार्यकर्त्यांची चांगली फळी नगरमध्ये निर्माण झालेली आहे. कार्यकर्त्यांच्या कामाची दाखल पक्षीय पातळीवर घेतली जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आहे. भविष्यात विविध आघाड्यांच्या बैठका घेऊन त्या माध्यमातून कार्यकत्यांचे संघटन आणखी मजबूत करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी प्रा.भानुदास बेरड, बाबासाहेब वाकळे, तुषार पोटे आदिंनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अॅड.विवेक नाईक यांनी केले तर आभार महेश नामदे यांनी मानले. यावेळी नगर अर्बन बँकेचे नूतन व्हाईस चेअरमन दीप्ती गांधी, संचालक भैय्या गंधे, मनेष साठे, राहुल जामगांवकर, भिंगार कॅन्टों.चे उपाध्यक्ष वसंत राठोड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या बैठकीस मयुर ताठे, शशांक कुलकर्णी, अभिषेक दायमा, भरत सुरतवाला, अभय भळगट, सुनिल कुलकर्णी, पंकज जहागिरदार, श्रीगोपाल जोशी, राकेश भाकरे, आशिष आनेचा, सुजित खरमाळे, निलेश जाधव, अभिजित चिप्पा, राहुल तांबे, प्रशांत चिरुवाले, ज्योत्स्ना कुलकर्णी, सुधा लाटे, संध्या पावसे, किसन भिंगारदिवे, अनंत जोशी, उदय अनभुले, संजय ढोणे, अमोल राजेभोसले, नितीन जोशी, अविनाश साखला, राजू मंगलाराप, बाळासाहेब गायकवाड, धनंजय जामगावकर, व्यंकटेश बोमादंडी, पुष्कर कुलकर्णी, अमित गटणे, ज्योत्सना मुंगी, प्रदीप परदेशी, अंजली देवकर आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
-------
Post a Comment