अहमदनगर : मॉडर्न पेंट्याथलॉन फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित चौथ्या लेझर रन ओपन नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत कु. स्वरूपा महेश रावस हि विजेती ठरली आहे. संपूर्ण भारतातून तिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. आता तिची निवड एशियन गेम्स मॉडर्न पेंट्याथलॉनसाठी झाली आहे.
या स्पर्धेत १४ राज्यातून २८८ खेळाडू सहभागी झाले होते. नुकत्याच नगरच्या वाडिया पार्क क्रीडा संकुलात झालेल्या स्पर्धेत कु. स्वरूपा रावस हिने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत ४ X ८०० मीटर धावणे व शूटिंग होते. कु.स्वरुपा हीची २०२२ मध्ये पोर्तुगाल येथे होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तेथे ती भारताचे नेतृत्व करणार आहे. या अंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी स्वरुपाने तयारी सुरू केली आहे. या यशात तिला तिचे आई-वडील यांच्यासह शिवम दीक्षित यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे. धावणे व नेमबाजी साठी कोणत्याही प्रशिक्षिका शिवाय ती सराव करत आहे. या पुढील काळात राष्ट्रीय शिबिर घेऊन भारताच्या चमूला प्रशिक्षण देण्याचा मानस तिने व्यक्त केला आहे.
मॉडर्न पेंट्याथलॉनमध्ये एकूण पाच खेळांचा समावेश असतो. त्यात घोडेस्वारी, धावणे, पोहणे, नेमबाजी, तलवारबाजी यांचा समावेश असतो. पाश्चात्त्य देशात हा खेळ खूप लोकप्रिय असून लंडन ऑलंपिक पासून तो स्पर्धेत खेळवला जात आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post a Comment