नूतन पदाधिकारी अर्बन बँकेला प्रगतीपथावर नेतील - ना.देवेंद्र फडणवीस
नगर - नगर अर्बन बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्र गंधे यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची औरंगाबाद येथील भाजपाच्या विभागीय बैठकीत अभिनंदन केले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री भागवत कराड,संघटन मंत्री महाराष्ट्र राज्य श्रीकांत भारतीय, आ. अतुल सावे, सुनील कर्जतकर, संघटन सरचिटणीस अॅड. विवेक नाईक, उपाध्यक्ष संतोष गांधी, मोहटादेवी संस्थांचे विश्वस्त डॉ. ज्ञानेश्वर दराडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी देवेंद्रजी फडणवीस म्हणाले, भारतीय जनता पार्टीने नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहेत. त्यामुळे देशात व राज्यात भाजप नंबर एकचाच पक्ष आहे. त्यामुळे आजही अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांवर आजही भाजपाचेच वर्चस्व निर्माण होत आहेत. . यावेळी प्रदेशाध्यक्षा चंद्रकांत पाटील यांनीही भैय्या गंधे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भैय्या गंधे व नूतन संचालकांचे अभिनंदन केले.
-------
-
Post a Comment