पवारांच्या नातवाला नगरपालिका निवडणुकीत ऐका ऐका जागेसाठी झुंजावे लागतेय म्हणजेच भाजपचा विजय निश्चित :प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील


अहमदनगर(प्रतिनिधी)कर्जत – जामखेड मतदारसंघात  माजी मंत्री प्रा  राम शिंदे   विरुद्ध आमदार रोहित पवार हा संघर्ष सतत उफाळून येत राहिला. या संघर्षावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी आजवर कधीच थेट भाष्य केले नव्हते.परंतू कर्जत नगरपंचायत निवडणुकीत ज्या पध्दतीचे राजकारण घडत आहे आणि घडवून आणले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपने राम शिंदे हे एकटे नसुन त्यांच्या पाठीशी पक्ष पुर्ण ताकदीने उभा आहे हेच चंद्रकांत पाटलांनी  केलेल्या ट्विटरवरुन दिसत आहे.   चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, शरद पवार यांचा वारसा, राज्यात सत्ता, अजित पवार उपमुख्यमंत्री असूनही रोहित पवार यांना ऐकेका जागेसाठी झुंजावे लागते याचाच अर्थ जनता भाजपसोबत आहे आणि आमचा विजय निश्चित आहे असे सांगत सत्तेचा दुरुपयोग आणि धनशक्ती विरोधात असली तरी जनशक्ती आपल्याकडे असल्याने राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार संघर्ष कराअसे अवाहन चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले.    कर्जत -जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार विरूध्द माजी मंत्री राम शिंदे  हा संघर्ष टोकाला गेला आहे. शुक्रवारी या संघर्षाचे नवे रूप महाराष्ट्रासमोर आले.भाजपकडून निवडणूक लढवणारा उमेदवारच राष्ट्रवादीने   पळवून नेला. या संपुर्ण प्रकरणामुळे भाजपच्या  गोटात मोठी खळबळ उडाली.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीत सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीची दखल थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी घेतली. कर्जतमध्ये घडत असलेल्या साम दाम दंड भेदाच्या राजकीय घडामोडींवर चंद्रकांत पाटलांनी भाष्य केले आहे.

आमदार रोहित पवार विरूध्द माजी मंत्री राम शिंदे या संघर्षात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी उडी घेतली असून कर्जतमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून रोहित पवारांविरोधात जोरदार निशाणा साधला आहे. या सर्व प्रकरणावर त्यांनी एक ट्विट केले आहे.कर्जत नगरपंचायत निवडणुकीत ऐनवेळी भाजपच्या उमेदवाराचा पाठिंबा मिळवण्याची वेळ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर आली हा त्यांचा निवडणुकीपूर्वीच झालेला पराभव आहे अशी जोरदार टिका करत चंद्रकांत पाटील यांनी केली आहे

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, शरद पवार यांचा वारसा, राज्यात सत्ता, अजित पवार उपमुख्यमंत्री असूनही रोहित पवार यांना ऐकेका जागेसाठी झुंजावे लागते याचाच अर्थ जनता भाजपसोबत आहे आणि आमचा विजय निश्चित आहे असे सांगत सत्तेचा दुरुपयोग आणि धनशक्ती विरोधात असली तरी जनशक्ती आपल्याकडे असल्याने राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार संघर्ष करा असे अवाहन चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post