छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा शहर शिवसेनेच्यावतीने निषेध




विकृत मनोवृत्तीचा शिवसेना बंदोबस्त करेल- संभाजी कदम

     नगर -    कर्नाटकच्या बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ नगर शहर शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निदर्शने करुन या घटनेचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर, संजय शेंडगे, विक्रम राठोड, सुरेश तिवारी, दत्ता जाधव, सचिन शिंदे, हर्षवर्धन कोतकर, प्रशांत गायकवाड, दत्ता कावरे, दिपक खैरे, संतोष गेनप्पा, गिरिष जाधव, अशोक दहिफळे, गौरव ढोणे, संतोष शिंदे आदि उपस्थित होते.

     यावेळी शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत. अशा महान व्यक्तीमत्वाची प्रेरणा सर्वांना मिळावी म्हणून देशातील प्रत्येक भागात त्यांचे पुतळे उभारण्यात आलेले आहेत. परंतु समाजकंटक आपल्या विकृत मनोवृत्तीतून या पुतळ्यांची विटंबना करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा समाजकंटकांवर कारवाई करुन त्यांना जबर शिक्षा केली पाहिजे, जेणे करुन यापुढे कोणीही असे कृत्य करणार नाही. शिवसेना छत्रपती शिवजी महाराजांचा विटंबना / अपमान करणार्‍या समाजकंटकांचा बंदोबस्त करण्यास सक्षम आहे, असे सांगून निषेध व्यक्त केला.

     याप्रसंगी दिलीप सातपुते म्हणाले, कानडींची दिवसेंदिवस दादागिरी वाढत चालली आहे. केंद्र सरकार त्याबाबत कठोर पाऊल उचलत नाही. कर्नाटक सरकार या समाजकंटकांच्या मागे आहे, तेथील मराठी जनतेवर अन्याय होत आहे. त्याचप्रमाणे राष्ट्र पुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. अशा समाजकंटकावर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने त्या ठिकाणी येऊन उत्तर दिले जाईल, असे सांगितले.



     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post