नगर - जगात गरीब श्रीमंत असे कुणी नसते. फक्त प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि प्रयत्न केल्यास मनुष्य आपली परिस्थिती बदलू शकतो. मुलांनी भविष्यात खूप प्रगती करावी आणि आपल्याला मोठे करण्यासाठी संघर्ष करणार्या आई-वडिलांच्या कार्याची जाणीव ठेवावी व त्यांना कधीही अंतर देऊ नये. शाळेपासून पाच-सहा कि.मी. पायपीट करत जाणार्या मुला-मुलींसाठी सायकल उपलब्ध करून देणे, हे महत्त्वाचे पाऊल म्हणायला हवे, शाळा घरापासून दूर आहे, यामुळे एकही मुलगा-मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठानचे जी तळमळ आहे, ती खरोखरच कौतुकास्पद असल्याचे राजाभाऊ कोठारी व्यक्त केले.
श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने श्री दत्त जयंती औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. याप्रसंगी श्री.कोठारी बोलत होते. यावेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना कोठारी म्हणाले कि, श्री दत्त जयंती उत्सव म्हणजे आता या नगर शहराची एक ओळख बनली आहे. या उत्सवाच्या माध्यमातुन गरजू लोकांना मोठा लाभ होत आहे. धार्मिक उत्सव म्हंटल कि धार्मिक विधी, विविध पुजा-आर्चा, भजन, किर्तन या पलीकडे जाऊन प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमांना सामाजिक उपक्रमांची जोड देऊ केल्यामुळे आज अनेकांना याचा लाभ होत आहे, असे ते म्हणाले.
प्रास्तविकात प्रतिष्ठानचे श्रीनिवास इपलपेल्ली म्हणाले की, श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठाच्या वतीने गेल्या 18 वर्षापासून दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येते आहे. या जयंती उत्सवाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी म्हणून प्रतिष्ठानच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची अडचण ओळखुन प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी सायकल वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम राबवुन विद्यार्थ्यांना मदत केली जाते. यावर्षी दत्त जयंती 4 विद्यार्थ्यांना सायकल देण्यात आले. असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश ताटी यांनी केले. तर आभार अजय म्याना यांनी केले.
या उपक्रमासाठी पोलिस अधिकारी राहुल गुंडू, सुमित इप्पलपेल्ली, श्रीनिवास बोगा (यु. एस. ए.) यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रम दरम्यान अक्षय वैद्य यांनी राजाभाऊ कोठारी यांचा स्केच तयार करून त्यांना देण्यात आले.
हा उपक्रम यशस्वीतेसाठी सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठान व निलाबंरी महिला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment