संविधान दिनानिमित्त तागड व पाचारणे परिवाराच्यांवतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप


     नगर - गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती सामाजिक संस्था, संघटना, संविधानाचा प्रचार सर्वसामान्य लोकांपर्यंंत करीत आहे. राज्यघटनेची मुलतत्वे, नागरिकांना दिलेले हक्क आणि त्यांची कर्तव्ये पटवून देणारा हा जागर आहे. संविधानाचा केवळ प्रचार नको तर प्रत्यक्षात कृतिशील उपयोग गरजेचा आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समता निर्माण केली. शिक्षणाशिवाय जगण्यात अर्थ नाही. देशाने आपल्यासाठी काय केले यापेक्षा आपण काय केले पाहिजे  असे मत बांधकाम व्यवसायिक विनोद पाचारणे यांनी व्यक्त केले.
     वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे माध्यमिक विद्यालयात संविधान दिनानिमित्त कोरोना महामारीत मातृ-पितृ छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तागड व पाचरणे परिवारातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी उद्योजक संदिप तागड, संतोष तागड, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य संदिप कांबळे, धीरज उर्किडे, राजू  तागड, सखाहरी तागड, बाळासाहेब भांड आदि उपस्थित होते.
     प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन संविधान प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच यावेळी 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेले, कोरोना महामारीत निधन झालेले शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थ्यांचे आई-वडिल अशांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संविधानाचे वाचन प्रा.महेंद्र थिटे यांनी केले तर त्याचे महत्व प्रा.रंगनाथ वाघ यांनी पटवून दिले.
     राजू तागड म्हणाले, डॉ.बाबासाहेबांनी शिक्षणाला महत्व दिले, त्यामुळे आम्ही सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी येवू नये यासाठी साहित्यांचे वाटप केले.
     प्राचार्य भरत बिडवे यांनी स्वातंत्र्य, समता, बंधूता खर्‍या अर्थाने तागड व पाचारणे परिवाराने जोपासली जे आज आपल्यात नाही, पण त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना शिकविण्यासाठी धडपड खर्‍या अर्थाने प्रेरणा देते.
     संविधानाचा कार्यक्रम घेतल्याबद्दल सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनय पाउलबुधे, डॉ.रघुनाथ कारंपुरी, डॉ.रेखाराणी खुराणा आदिंनी समाधान व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पेन, डबा,पाण्याची बॉटल असे साहित्य देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.अर्चना कर्डिले, प्रा.वैशाली वाघुले, प्रा.सविता वाळके, विजय नवले, प्रा.विनायक सापा आदिंनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन वैशाली शिर्के यांनी केले तर आभार प्रा.जयश्री केदार यांनी मानले. यावेळी शिक्षक-शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
     
 
     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post