शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी संभाजी कदम पदाच्या माध्यमातून पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचावे- विक्रम राठोड


     नगर - शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविला आहे. नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीच शिवसैनिक धावून गेले आहेत. काम करणार्‍यांना पक्षाने नेहमीच पदाच्या माध्यमातून त्यांचा योग्य तो गौरव केला आहे. माजी शहरप्रमुख राहिलेले संभाजी कदम यांनी पक्ष वाढीसाठी अनेक उपक्रम राबविले, त्यामुळे अनेक युवक सेनेत दाखल झाले होते. आता पुन्हा त्यांची शिवसेना शहरप्रमुखपदी झालेली निवड ही पक्षातील त्यांच्या योगदानाची पावती आहे. आताही ते या पदाच्या माध्यमातून पक्षाचे कार्य अधिक व्यापक करतील. असा विश्वास आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी नेहमीच चांगले काम करणार्‍यांच्या पाठिशी राहिले आहे. शहरातील युवकांचे पाठबळ हे त्यांच्या मागे राहून शिवसेनेचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावे, असे प्रतिपादन युवा सेनेचे राज्य सहसचिव तथा जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी केले.

     शिवसेनेच्यावतीने शिवालय येथे शिवसेना शहरप्रमुखपदी संभाजी कदम यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक दत्ता कावरे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, मदन आढाव, संग्राम शेळके, उपशहरप्रमुख संतोष गेनप्पा, युवा सेना शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर,  महिला शहराध्यक्षा अरुणा गोयल, अंबादास शिंदे, शिवाजी कदम, कुणाल खैरे, शेखर आढाव, पप्पू थोरात, दादासाहेब घोडके, सनी आहुजा, प्रमोद जाधव आदि उपस्थित होते.

     सत्कारास उत्तर देतांना संभाजी कदम म्हणाले, शिवसेना उपनेते स्व.अनिल राठोड यांनी शहरातील नागरिकांसाठी उभारलेले मोठे कार्य यापुढे आपण सुरु ठेवू. सर्वनगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक यांना बरोबर घेऊन शिवसेना पक्ष वाढीसाठी काम करु. तसेच शिवसेनेच्या शहरातील विविध भागात शाखा वाढविण्यासाठी प्रयत्न करु. शिवसेनेला नगरमध्ये मानणारा मोठा वर्ग आहे, सर्वसामान्या नागरिकांना न्याय देण्यासाठी पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन शिंदे यांनी केले तर मदन आढाव यांनी आभार मानले.


 

     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post