काका शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्या फाउंडेशनने जे शिबीर घेतले हे नक्कीच अभिमान: डॉ. संदिप सुराणा




नगर (प्रतिनिधी) हाडे ठिसुळ होवून भुगा होण्यापेक्षा व हाडांची झीज होऊन कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी आदी  आजार होउ नये याकरीता हाडांची मशिनद्वारे (BMD) कॅल्शियम तपासणी करून असे आजार टाळता येतात . वेळीच उपचार होणे महत्वाचे आहे सूर्या फाउंडेशनचे अध्यक्ष काका शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्या फाउंडेशनने सिव्हिल हडकोत जे शिबीर घेतले हे नक्कीच अभिमानास्पद आहे.असे प्रतिपादन सिटी केअर रुबी हॉल क्लिनिक तज्ञ - डॉ. संदिप सुराणा  यांनी केले.
सावेडीतील सिव्हील हडको येथे सूर्या फाउंडेशनचे अध्यक्ष काका शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्या फाउंडेशन आणि सिटी केअर रुबी हॉल क्लिनिकच्या वतीने हाडातील मशिनद्वारे (बोन डेनसिटो मिटर) मोफत कॅल्शियम तपासणी शिबिर  तसेच रक्तदान शिबीर आयोजित केले होते.त्यावेळी डॉ सुराणा बोलत होते.यावेळी काका शेळके,महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती व माजी नगरसेविका श्रीमती कलावती शेळके ,रवि राउत,पप्पू शेळके,अथव गंगावणे,मुळे काका, आदी मान्यवर उपस्थित होते.

काका शेळके म्हणाले की, सामाजिक बांधलकी या नात्याने समाजाचे मी काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने मी हे शिबीर घेत आहे. मोफत शिबीरांच्या माध्यमातून सेवा देण्याचे काम करत आहे. प्रत्येक गोष्ट महाग होत आहे. त्यामुळे गरीबांना उपचार घेणे अवघड जात आहे. परंतु अश्यांना वेळी सूर्या फाउंडेशन व सिटी केअरच्या माध्यमातून गोरगरीबांना मोफत कॅल्शियम तपासणी करत आहोत सोबत कॅल्शियमची औषधे मोफत देण्यात येतील..तसेच कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा आहे 'रक्तदान सर्वश्रेष्ठ दान समजले जाते त्यामुळे रक्तदानात मी स्वत सह कार्यकर्तेही रक्तदान करणार आहोत.
श्रीमती कलावती शेळके यांनी मनोगत व्यक्त केले.शिबीर यशस्वितेसाठी सूर्या फाउंडेशनचे सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले. यावेळी दत्ताजी  भाले  रक्तपेढीचे सहाकार्य लाभले. किरण बोरूडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संजय नाबगे,मनिषा पंधे, दत्ताजी  भाले  रक्तपेढीचे डॉ.चरणसिंग चव्हाण,डॉ विलास मढीकर आदी उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post