मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी विशाल गणेश मंदिरात आरती
उद्धवजी ठाकरे लवकरच बरे होऊन पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतील - भाऊ कोरगावकर
नगर - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जेव्हापासून मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून त्यांनी सुटी न घेता कायम जनतेची कामे करत राहिले. गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोनाने जागतिक स्तरावर आरोग्याबाबतचा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. देशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात होते, अशाही परिस्थितीत मुख्यमंत्री व सहकार्यांनी खंबीर भुमिका घेत कोरोनाचा मोठ्या धाडसाने मुकाबला केला. लॉकडाऊन काळातही जनतेची काळजी घेतली, त्यामुळे कोरोना नियंत्रित ठेवण्यात यश मिळाले. हे करत असतांना विकास कामांनाही प्राधान्य दिले, त्यामुळे रोजगार, उद्योग-धंदेही सुरळित सुरु झाले. त्यांनी कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात केलेल्या उत्कृष्ट कार्याचे देशातील अनेक संस्थांनी कौतुक केले. या कालावधीत त्यांनी आपल्या तब्बेतीकडे दुर्लक्ष केले, थोड्याच दिवस त्यांना आराम मिळून ते लवकरच बरे होऊन पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतील, अशी प्रार्थना श्री विशाल चरणी करत असल्याचे शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे शिवसेनेच्यावतीने आरती करण्यात आली. याप्रसंगी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, महापौर रोहिणी शेंडगे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना प्रमुख विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, माजी गटनेते संजय शेंडगे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, दिपक खैरे, दत्ता जाधव, संग्राम शेळके, संतोष गेनप्पा, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, काका शेळके, अंबादास शिंदे, गौरव ढोणे, संजय सागावकर, श्रीकांत चेमटे, अशोक दहिफळे, मंगेश शिंदे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या, मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षांपासून बजावलेली भुमिका ही जनतेला भावली आहे. जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांना दिलासा देण्याचे काम त्यांनी केले आहे. कोरोनासारख्या कठिण परिस्थिती केले कार्य अभुतपूर्वच असेच होते. लवकरच त्यांच्या तब्बेत्तीत सुधारणा होवो हीच सदिच्छा !
याप्रसंगी दिलीप सातपुते म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष आणि मुख्यमंत्री म्हणून सुरु असलेले काम अत्यंत वाखणण्याजोगे आहे. जनतेच्या सेवेचा ध्यास घेऊन ते काम करत आहेत, हीच प्रेरणा शिवसैनिकांना मिळत आहे. त्यामुळे त्यांना चांगले आरोग्य लाभावे, यासाठी शिवसेनेच्यावतीने श्री विशाल गणेश मंदिरात आरती करण्यात आली असल्याचे सांगितले.
Post a Comment