जामखेड नगर परिषद वाढीव पाणी पुरवठा योजना ... वस्तुस्थिती आणि विद्यमान . लोकप्रतिनिधीनी केलेला विपर्यास :युवा मोर्चा अध्यक्ष शरद कार्ले

जामखेड नगर परिषद वाढीव पाणी पुरवठा योजना  वस्तुस्थिती आणि विद्यमान    .              लोकप्रतिनिधीनी केलेला विपर्यास :युवा मोर्चा अध्यक्ष शरद कार्ले
जामखेड(प्रतिनिधी)जामखेड नगर परिषदेची वाढीव पाणी पुरवठा योजनेची सुधारित तांत्रिक मंजुरी आता विद्यमान लोकप्रतिनिधीनी मोठा गाजावाजा करून प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध करून त्याही गोष्टीचा इव्हेन्ट केला ...
          जामखेड, ग्रा.पं. मधुन नगरपरिषद मध्ये परिवर्तित झाल्यानंतर वाढीव लोकसंख्या विचारात घेता वाढीव नविन पाणी पुरवठा योजनेची गरज होती.साधारणतः १९७४ ची जुनी योजना,शहरीकरणास आणि वाढीव लोकसंख्येस पुरेशी नव्हती. अशातच मा श्री राम शिदे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासनाच्या योजनेत समाविष्ट करणेसाठी नगर परिषदेच्या माध्यमातून एक योजना प्रस्तावित करणेत आली ... त्यावेळेस च्या *महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजने अंतर्गत वाढीव पाणी पुरवठा,जामखेड* ,नगर परिषद या शीर्षकाखाली योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर केला.     तत्कालिन कर्जत जामखेड चे लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्री राम शिंदे यांनी पुढाकार घेऊन हि योजना मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले .
             या शीर्षअंतर्गत योजनेसाठी जागेची पाहणी, क्षेत्रिय पाहणी, तांत्रिक शक्यता(Technical feasibility) उदभवाची(source)पाहणी दि २२/०६/२०१८ रोजी करून सर्व गोष्टींची पूर्तता होऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग नाशिक यांनी दि . ११/ १२ / २०१८ रोजी तांत्रिक मंजुरी दिली ...
      परंतु दरम्यानच्या काळात इतर पूर्ततेसाठी वेळ गेल्याने व अंदाजपत्रक मागील दर पत्रकानुसार असले कारणाने सन २०१९ / २० च्या सुधारित दरपत्रकानुसार नविन अंदाज पत्रकानुसार ९ / ०७ / २०१९ रोजी सुधारित तांत्रिक मंजुरी एकूण ११५,९१,१७,३१९.०० रुपये इतक्या अंदाजपत्रकीय रकमेला मंजुरी मिळवली . त्यानुसार योजनेच्या १ % तांत्रिक तपासणी अंतर्गत शुल्क १,२३,१९५१४.०० रुपये शासनाला म.जी. प्रा. वि. अ.नगर डी. आर. नं.५६११ या शीर्षाअंतर्गत दि११/०७/२०१८ रोजी शासनाला जमा केले . आणि या योजनेची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेड रोवली गेली ..
     पाणी उदभव(source) शाश्वत(sustainable) असणे गरजेचे होते आणि जामखेड शहरातील भविष्यातील वाढीव लोक संख्येचा विचार करता जवळ असा शाश्वत उदभव नव्हता म्हणून जवळचा शाश्वत उदभव म्हणून उजनीच्या बॅक वॉटर मधून घेण्याचे ठरले त्यासाठी उपलब्ध पाण्यातून बिगरशेती साठी पाणी म्हणून शासनाकडून ४.६२५ द .ल.घ.मी. इतके पाणी मंजूर करून घेतले दि .०९/०१/२०१९ रोजी ते पत्र प्राप्त झाले . अशा प्रकारे जामखेड नगर परिषदेची वाढीव पाणी पुरवठा योजना आकाराला आली .....
           आता विद्यमान लोकप्रतिनिधीनी१३८.८४ कोटी अंदाजपत्रकीय किंमत असलेल्या योजनेला नविन तांत्रिक मंजुरी दि१३/०७/२०२१ रोजी घेतली आणि ते म्हणत आहेत कि जामखेड साठी नविन योजना मंजुर करून घेतली तर यामध्ये नविन काय आहे?
  एकतर मा श्री राम शिंदे यांनीही ही योजना दर दिवशी, दर माणशी १३५ लि. याप्रमाणेच डिझाइन करून घेतली आहे त्यासाठीचा जो शाश्वत उदभव ( sustainable source) आहे तोही त्यावेळेच्या शासन निर्णयानुसारच उपरोकत दिनांक ला मंजूर केले आहेत तेच आहेत . शासनाकडून पाणी मंजुरीचे ४.६२५ द.ल.घ.मी. त्याच दिनांकाचे पत्र नविन सुधारित तांत्रिक मंजुरी घेताना जोडले आहे तसेच तांत्रिक शुल्क भरण्याचा दिनांक ११/०७/२०१८ रोजीचेच पत्र जोडलेले आहे ..... मग नविन प्रयत्न काय केले?? याच योजनेचे तत्वतः मंजूरीचे पत्र मा .ना . फडणविस साहेबांनी जाहीर सभेत जामखेडच्या जनते समोर नगर परिषद पदाधिकारी आणि मा श्री राम शिंदे यांचे कडे सुपूर्द केले होते . त्याच शीर्षखाली मंजूर असलेल्या योजनेची सुधारित दरानुसार तुम्ही सुधारित अंदाज पत्रक तयार करून तांत्रिक मान्यता घेतली हे तुम्ही प्रामाणिकपणे कबूल करायला पाहिजे नविन काहीच केलेले नाही ..
          तांत्रिक बाबी बघितल्या तर पूर्वी २ ठिकाणी मुख्य संतुलन टाकी(Main balancing reservoir) किंवा त्यालाMBR म्हणतात ते आता नाहीत . त्याचप्रमाणे मुख्य टाकी(ESR) ६ होत्या त्या आता ५ आहेत .... कदाचित तांत्रिक मुद्दयाचं म्हणाल तरMBR कशासाठी पाहिजे? तर शुद्धीकरण कुंभातून(Water Treatment Plant) पाणी उचललं जात नसेल तर त्याठिकाणी ते साठून ठेवता येईल पण आता पाणी गुरुत्वाकर्षण पद्धतीने शहरात फिरवायचे आहे त्यामुळे पंपिंग नाही आणिMBR ही नाही म्हणजेच दिवसभर कोठे ना कोठे पाणी चालू राहिल??असे तरी दिसते . कदाचित आमचं तांत्रिक ज्ञान कमी असू शकते तरी तज्ञानी याबाबत खुलासा करावा ....
          जर नविन वाढीव पाणी पुरवठा मंजूर केली म्हणता तर मग नविन काय?? फक्त रकमेतील फरक हा नविन दर पत्रकामुळे पडलेला आहे . योजनेचे संकल्पचित्र(plan), शाश्वत उदभव,(sustainable source), अंदाजपत्रक(estimate) तेच आहे आणि वितरण व्यवस्था सुद्धा पहिल्याच प्लॅन मधील आहे . मग मी केलं आणि शासनाकडून वाढीव रक्कम मंजूर केली हे अगदी ठामपणे खोटंच आहे असे म्हणावे लागेल .
मा प्रा श्री राम शिंदे यांनी या योजनेचा संपूर्ण प्रस्ताव मार्गी लावला होता तांत्रिक मंजुरी शासनाने दिली होती आणि आता तुम्हीही तिच योजना नविन म्हणून गाजावाजा करत आहात तर मग विधान सभेच्या निवडणुकांनंतर तुम्ही ही योजना कार्यान्वित(execution) करण्यासाठी २वर्षे वाट का पाहिली?? पाण्यापासून जामखेडकराना वंचित ठेवण्याचे पाप तुम्ही का केले? फक्त मी योजना केली या श्रेयवादासाठी जामखेडकरांना तहानलेले ठेवण्यात तुम्ही धन्यता मानली .. असाच काहीसा प्रकार कर्जत तालुक्यातील *तुकाई योजनेच्या* संदर्भात हि केला आहे . त्यावेळेस पाइपच्या व्यासावरुन तुम्ही योजनेची खिल्ली उडवली, यामधून किती पाणी येणार?? यापेक्षा शेतकरी मोठ्या व्यासाची पाइपलाइन करतो असे सांगून तुम्ही विनोद करत होतात आणि लोकांना मोठ्या पाण्याचे स्वप्न दाखवत होतात काय झाले त्या योजनेचे :...
 आता तर आहे ती योजना ही बंद केली आणि योजनेसाठी वाटपाच्या व्यतिरिक्त उपलब्ध केलेले पाणीही गायब केले म्हणजेच मुळापासूनच त्या योजनेचे उच्चाटन केले का?? तर फक्त आणि फक्त स्वार्थ आणि श्रेयवाद ...... श्रेय तुम्ही जरूर घ्या पण त्यासाठी आहे त्या योजनांना विलंब करणे, बंद करणे एका लोकप्रतिनिधीला कितपत संयुक्तिक आहे . . स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवता आणि लोकांचीच जिरवता ??...
आता लोकांचा पुरता भ्रमनिरास झालेला आहे .
  कोंबडं कितीही झाकून ठेवले तरी उजाडायचे राहत नाही . त्यांनी मंजूर केलेल्याच योजना तुम्ही कार्यान्वित करण्याचे काम करत आहात पण त्या फक्त विलंबाने करता कारण त्या योजनेचे श्रेय श्री राम शिंदे यांना मिळू नये बाकि जनतेची स्मरण शक्ति अल्प असते या गोष्टीवर तुमचा खूपच विश्वास दिसतो ....
परंतु जनतेच्या लक्षात आलेले आहे.
तुम्ही कार्पोरेट क्षेत्रातून आल्यामुळे तुम्ही फक्त मार्केटिंग गिमिक्स वापरले आणि जनतेल्या गोळ्या बिस्किटाची भुरळ घालून भावनिक खेळ केलात. पण आता येणाऱ्या काळात जनता अशा कुरघोड्याना माफ करणार नाही .
        तुम्ही कितीही म्हटले आम्ही शासनाकडून काहीही आणि कितीही मंजूर करून आणतो पण तुमच्या अभासी विकासासारखे(virtual development) निधीचे आकडे सुद्धा फसवेच आहेत असे म्हणावे लागेल . नवे पर्व..... जुनेच सर्व....... फक्त पॅकिग्जचा खर्च.....

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post