निशांत दिवाळी अंकाची 21 वी आवृत्ती प्रसिद्ध आकर्षक मुखपृष्ठासह वाचनिय लेखामुळे अंकाचा दर्जा टिकून

निशांत दिवाळी अंकाची 21 वी आवृत्ती प्रसिद्ध
आकर्षक मुखपृष्ठासह वाचनिय लेखामुळे अंकाचा दर्जा टिकून
अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील 21 वर्षांपासून प्रसिद्ध होत असलेल्या निशांत दिवाळी अंकाची 21 वी आवृत्ती प्रसिद्ध झाली असून, आकर्षक मुखपृष्ठासह वाचनिय लेखामुळे अंकाचा दर्जा टिकून ठेवल्याची भावना संपादक निशांत दातीर यांनी व्यक्त केली. 
गेल्या 21 वर्षांपासून नगर जिल्ह्यातून प्रकाशित होत असलेल्या निशांत दिवाळी अंकाचे प्रकाशन यापुर्वी तात्कालीन केंद्रीय मंत्री खा.शरद पवार, गोपीनाथ मुंडे, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले, रेल्वे मंत्री खा.रावसाहेब दानवे, महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडट्टेवार, सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे, राज्यमंत्री दत्तामामा भरणे, ना.बच्चू कडू, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, प्रा.राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले आदि मान्यवरांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला आहे. 
या वर्षी डिजिटलायझेशन व इंटरनेटच्या युगातही प्रिंट मिडियाला महत्व देऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रिंट स्वरुपात अंक वाचकांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तब्बल दोन वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीचे संकट असल्याने यावर्षीच्य दिवाळी अंकात ही ‘काय काय बदलले कोरोनाने’ या परिसंवादात मधुरा कुलकर्णी, अमृता वाडेकर, कांचन रिद्धी, महेश जोशी, क्षितीजा देव या मान्यवरांचे विचार मांडले आहेत. ‘सिमेवर रात्रंदिन आव्हानांची मालिका’ या परिसंवादात निवृत्त कर्नल अनिल आठ्ठले, विनायक तांबेकर, वासुदेव कुलकर्णी, प्रा.उत्तरा सहस्त्रबुुद्धे यांचे विचार आहेत. ‘पोलिसांची प्रतिमा काळवंडते’ या विषयावर प्रविण दीक्षित व सुरेश खोपडे या निवृत्त अधिकार्‍यांचे मत मांडलेत. ‘स्पर्धा परिक्षेचे मृगजळ आणि त्यांचं अर्थकरण’ या परिसंवादात प्राचार्या डॉ.गोरख सांगळे, अ‍ॅड.निळकंठ तायडे, विशाल लामखेडे, प्रा.लक्ष्मण पठारे यांचे अभ्यासपुर्ण लेख आहेत. ‘सक्षम सहिष्णू उद्याची पहाट’ या परिसंवादात वैष्णवी कुलकर्णी, चंद्रशेखर चितळे, हेमंत हरहरे, डॉ.सच्चितानंद शेवडे, लेफ्ट.जन.दत्तात्रय शेकटकर, अजित अभ्यंकर आदि मान्यवरांचे विचार आहेत. 
त्याचबरोबर प्रा.भानुदास बेरड, सलिमखान पठाण, सुजाता पुरी, आशिष निनगुणकर, योगिता भिटे, नागेश शेवळकर, अंजली श्रीवास्तव आदि स्थानिक लेखकांचे लेखांचाही समावेश करण्यात आला आहे. सुर्यकांत वैद्य, प्रा.वर्षा कावरे, दादासाहेब सादोळकर, प्रा.रमाकांत दीक्षित, शरद आत्रे, मितवा श्रीवास्तव, सुजाता पुरी, सत्यपाल श्रीवास्तव यांनी कवितांचा साज चढविला आहे. राशी भविष्य ज्योतिष भास्कर नारायण कारंजकर यांचे आहे.
एकूण 120 कृष्णधवल पानांसह 22 रंगीत पानांचा अंक जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. या विशेष अंकासाठी लोकमाता अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेचे चेअरमन अशोक राशिनकर, महेश्वर मल्टीस्टेटचे चेअरमन दत्तात्रय गावडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, बाबासाहेब सानप, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख आनंद लहामगे, डॉ.गणेश नजन, डॉ.स्वप्नील माने, डॉ.राहुल पंडित, कोणार्क उद्योग समुहाचे राजेंद्र पाचे, दादाभाऊ चितळकर, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलिमखान पठाण, डॉ.अविनाश मोरे, प्रा.कुंडलिक आठरे आदि मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले आहे. 
आकर्षक मुखपृष्ठ ज्ञानेश शिंदे, अक्षर जुळवणी ऋतुजा प्रेस सर्व्हीस, अंक सजावट पुणे येथील अद्वैत फिचर्सने केले असून, जाहिराती दिव्य भास्कर प्रिंटर्सचे बापू बर्‍हाटे यांनी केल्या आहेत. कार्यकार्य संपादक म्हणून प्रा.गणेश शिंदे यांनी तर सह.संपादक म्हणून उमेश अनभुले, दत्तात्रय झगडे, अमोल देवकर, रामेश्वर तांबे यांनी जबाबदारी पार पाडली आहे. 
--------

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post