ग्रुप अँडमिन नंदकिशोर निळकंठ व बजरंग कदम यांची माहिती
इस्लामपूर (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील निवडक पदाधिकारी यांना सोबत घेवून व ग्रुपची आचारसंहिता असणारा एकमेव जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुपच्या वतीने रविवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी विविध उपक्रमाचे आयोजन मा.श्री. आण्णासाहेब डांगे इंटर नॅशनल स्कूल, इस्लामपूर येथे सकाळी १०:३० वाजता करण्यात आले असल्याची माहिती ग्रुपचे अँडमिन श्री. नंदकिशोर निळकंठ व बजरंग कदम यांनी दिली.
शैक्षणिक, सामाजिक, उद्योग, पत्रकारिता,महिला,पोलीस ,राजकीय, शेतकरी, समाज सेवक व निरनिराळ्या राजकीय पक्षांमध्ये काम करत असलेल्या अनेकविध प्रकारच्या मित्र मंडळींचा जिवलग मित्र मंडळ असा ग्रुप आहे. सामाजिक बांधिलकीची जाण आणि भान असलेला हा अत्यंत संवेदशिल ग्रुप असुन. वेळोवेळी नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यावर्षी कोरोना कालावधीत कौतुकास्पद कामगिरी करणा-या आशा वर्कर्स यांचा विशेष गौरव संपन्न होत आहे. त्यामध्ये सुषमा शंकर कांबळे, दिपाली संजय पाटील, माया मोहन जाधव सर्व इस्लामपूर, निलम अशोकराव नांगरे (पाटील),कापूसखेड, सुरेखा सयाजी गावडे,पेठ यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.
जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुपच्यावतीने सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यार्थ्यांना सायकल वाटप,
शंभर गरजू विद्यार्थ्यांना स्कुल बँग वाटप, इस्लामपूर येथे दोन बसावयाची बाकडी वाटप, इस्लामपूर व आष्टा येथील आश्रमाला धान्य वाटप व गरजू विद्यार्थीनीला शैक्षणिक फी प्रदान , स्मारक भवन परिसरात वृक्षांचे रोपण अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यापूर्वी खिरवडे ता.शिराळा व कामेरी ता. वाळवा येथे ग्रुपच्या वतीने निरनिराळे उपक्रम प्रभावीपणे राबविले होते.
तरी इस्लामपूर येथील मा. श्री. आण्णासाहेब डांगे इंटर नॅशनल स्कूल, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली येथे संपन्न होणाऱ्या या नाविन्यपूर्ण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जिवलग मित्र मंडळ ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment