फी कमी करण्याबाबत निर्णय झाला नाही तर मनसेच्या वतीने आंदोलन चिघळणार : नितीन भुतारे


 फी कमी करण्याबाबत शिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत निर्णय झाला नाही तर मनसेच्या वतीने आंदोलन चिघळणार.... नितीन भुतारे
अहमदनगर(प्रतिनिधी)
मनसेच्या पाठपुराव्यानंतर शिक्षण अधिकारी घेणार सर्व खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची, मुख्याध्यापकांची बैठक मनसेला आश्वासन.

खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची फी कमी करण्याबाबत मनसेच्या विषयांवर चर्चा होणार.

मनसेच्या आंदोलनामुळे, निवेदन देऊन आपण अहमदनगर जिल्हा तसेच शहरातील खाजगी इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळांची फी कमी करण्याबाबत एक सर्व मुख्याध्यापक तसेच संचालकांची बैठक घेऊन त्यांना तुम्ही कोरोना आजारातील काळात फी आकारणी संबंधी आदेश, माहिती देणार आहेत त्याबद्दल मनसेच्या वतीने आपले आभार मानतो व आपण आम्हाला या बैठकीत आमच्या मागण्यांची विषय सूची मागितली आहे. ती तुम्हाला खालीलप्रमाणे देत आहोत त्यानुसार आपण योग्य ती कारवाई करून गोरगरीब सर्वसामान्य जनतेला या कोरोना काळात हाताला काम, उद्योगधंदे, व्यवसाय बंध असल्यामुळे फी कमी करुण न्याय द्यावा हि नम्र विनंती तसेच खुप वेळा आपणास निवेदन देऊन देखील खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची फी कमी केली गेलेली नसल्यामुळे अपणाकडे शेवटची मागणी या नंतर आम्ही विद्यार्थी तसेच पालकांना आमच्या पद्धतीने शाळांच्या तसेच आपल्या जिल्हापरिषद आवारात, अहमदनगर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या विरोध आंदोलने करून न्याय मिळवून देऊ त्यानंतर कायदा, सुव्यवस्था निर्माण होइल त्यास सरकार, आपण व संबंधित प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असा ईशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला या मनसे अणि शिक्षणाधिकारी बैठकीत मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे उपस्थीत होते.

विषय सूची
१) सन २०२० सन २०२१ या वर्षात संपूर्ण शैक्षणिक वर्ष हे ऑनलाईन अभ्यास क्रमात गेल्यामुळे शाळेच्या ईतर कुठल्याही बाबींचा, वस्तूंचा वापर केला गेला नसल्यामुळे फक्त शैक्षणिक फी शिकवणी फी शाळांनी अकारावी ईतर सर्व फी माफ कराव्यात
२) सन २०२१ ते सन २०२२ हे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून अजून पर्यंत शाळा भरतील का नाही याची कोरोनाच्या  लाटांमुळे माहित नसल्यामुळे प्रथम सत्र हे ऑनलाईन होणार यात शंका नाही त्यामुळे प्रथम सत्राची फी सुध्दा ही ईतर सर्व फी माफ करून फक्त शिकवणी फी शाळांनी घ्यावी. तसेच दुसऱ्या सत्रात शाळा भरल्या गेल्यास शाळांनी दुसऱ्या सत्राची पूर्ण फी घ्यावी तसेच दुसरे सत्र सुध्दा ऑनलाईन राहिल्यास त्या दुसऱ्या सत्राची फी सुध्दा ईतर फी माफ करून फक्त शिकवणी फी घ्यावी ही नम्र विनंती
३) तसेच पालकांना शिकवणी फी भरण्याकरिता पाच टप्यात मुभा द्यावी
४) फी भरली नाही तसेच कुठल्याही कारणाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया घालू नये तसेच ऑनलाईन शिक्षण, परीक्षा बंध करू नये
५) ऑनलाईन शिक्षण सूरू असताना मुलांना जास्त वेळ मोबाईल द्वारे समोर बसवू नये, अभ्यासक्रम सांगून पुस्तकातून अभ्यास करावयास सांगावा शिक्षकांचा अभ्यासक्रम समजून सागण्याकरिता एक विषयाचा १५ मिनिटे व्हिडिओ असावा या मुळे सर्व अभ्यास पुस्तकातून केल्यास मुलांना डोळ्याचे व विकार आजार होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
६) ऑनलाईन शिक्षण सूरू असताना मुलांना युनिफॉर्म, शाळेतून वह्या पुस्तके व ईतर साहित्य खरेदी करिता सक्ती करु नये ऑनलाईन शिक्षण सूरू असताना युनिफॉर्म घालण्याची काहीही गरज नाही. याची आपण नोंद घ्यावी 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post