वाफगावचा होळकर वाडा होणार संरक्षित स्मारक, धनगर प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश

वाफगावचा होळकर वाडा होणार संरक्षित स्मारक, धनगर प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश

पुरातत्व विभाग,पुणे यांनी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय,महाराष्ट्र राज्य यांना सादर केला प्रस्ताव
 
ठाणे (विशेष प्रतिनिधी) : पुण्यातील वाफगाव येथील आद्य स्वातंत्र्यसेनानी महाराजा यशवंतराव होळकर जन्मस्थान असलेल्या होळकर वाड्याला राज्य  संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे यासाठी धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करून मागणी करण्यात आली होती याची दखल शासनाने  घेतली असून कारवाई सुरु केली आहे
 
होळकरांच्या वैभवशाली इतिहासाचे उदाहरण म्हणजे वाफगावचा वाडा होय. हा किल्ला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपल्या राज्यकाळात बांधला.हा किल्ला श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर(प्रथम) यांचे जन्मस्थान असलेला होळकर वाडा आहे या किल्ल्याची (वाड्याची) दुरवस्था झाली असून ऐतिहासिक ठेवा नष्ट होत आहे परंतु  शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.यासाठी हा वाडा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावा याबाबत धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी शासनाच्या  पुरातत्व व वस्तुसंग्रहालये  संचालनालय यांच्याकडे आपले सरकार ऍप्सवरून २६ जुलै २०१९ रोजी मागणी केली होती.तसेच आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता याची दाखल घेऊन पुरातत्व विभाग,पुणे यांनी यशवंतराव होळकर वाडा संरक्षित स्मारक म्हणून घोषित करणेकामी आवश्यक कारवाई सुरु केली होती .यासाठी आवश्यक असलेले दस्तावेज प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पुरातत्व विभाग,पुणे यांनी धनगर प्रतिष्ठानला दिले होते यावर प्रतिष्ठानच्या वतीने पाठपुरावा करण्यात येत होते. आता  किल्ला संरक्षित स्मारक करण्याकरिता आवश्यक असलेले दस्तावेज प्राप्त झाल्यावर तसा प्रस्ताव पुरातत्व विभाग,पुणे यांनी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय,महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सादर केला आहे .  

 सहाय्यक संचालक,पुरातत्व विभाग,पुणे यांनी  यशवंतराव होळकर वाडा संरक्षित स्मारक म्हणून घोषित करणेकामी आवश्यक महसूल दस्तावेज मिळणेबाबत तहसीलदार,खेड जिल्हा पुणे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती . त्या मागणीनुसार तहसीलदार खेड यांच्याकडून महसुली दस्तावेज ,पुरातत्व विभाग,पुणे कार्यालयास प्राप्त झाले त्यानुसार पुरातत्व विभाग,पुणे यांनी किल्ला संरक्षित स्मारक करण्याकरिता आवश्यक असलेले दस्तावेज एकत्र करून एक प्रस्ताव  पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय,महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सादर केला आहे असे लेखी पत्र सहाय्यक संचालक  पुरातत्व विभाग,पुणे यांनी धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांना दिले आहे  . त्यामुळे धनगर प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश आले असून वाफगाव किल्ला राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post