तीन वर्षापासून फसवणुकीच्या दाखल असलेल्या दोन गुन्ह्यातील आरोपीला आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दिल्लीत शिताफीने पकडले

नगर (प्रतिनिधी)

कुरियर वाले आहोत, ऑपरेटर आहोत, अशा वेगळ्या प्रकारच्या शक्कल लढवत  गेल्या तीन वर्षापासून फसवणुकीच्या दाखल असलेल्या दोन गुन्ह्यातील आरोपीला नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दिल्ली येथे मोठ्या शिताफीने पकडून गुन्हा उघडकीला आणला आहे .या प्रकरणा संदर्भामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली असून तो मुळचा पुणे येथील रहिवासी असून अटक केल्यानंतर त्याला आज न्यायालयामध्ये हजर केले असता त्याला 28 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी दिली.

या प्रकरणांमध्ये आरोपी प्रसाद बाळासाहेब गुंड, मूळ राहणार पुणे, हल्ली राहणार दिल्ली याला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार अमोल गाडेकर राहणार पुणे हा फरार आहे.

आरोपी प्रसाद गुंड याने नगरच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या बेरोजगारांसाठी देण्यात येणाऱ्या कर्ज प्रकरण यासंदर्भातला विषय होता, गुंड याने  बँक ऑफ महाराष्ट्र कडून 98 लाख रुपयांचे कर्ज नगरच्या चितळे रोड शाखेमध्ये घेतलेले होते ,तर बँक ऑफ महाराष्ट्रा च्या नेप्ती  शाखेतून त्याच्या साथीदाराने 80 लाख रुपयांचे कर्ज 2015 साली घेतलेले होते, सदरचे कर्ज घेतल्यानंतर त्यांना एमआयडीसी या ठिकाणी प्लास्टिक पासून पेट्रोल तयार करण्याच्या संदर्भातला प्लांट उभा करायचा होता, मात्र त्यांनी कोणतीच मशनरी खरेदी न करता रक्कम त्यांनी परस्पर काढून  स्वतःच्या दुसऱ्या खात्यात  घेतली व ती अन्य कामासाठी वापरली. ँकेला कोणत्याही प्रकारचे हप्ते त्‍यांनी भरले नाही, बँकेने याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर एक प्रकारे बँकेची फसवणूक झाली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यावेळेला बँकेने पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला. या संदर्भामध्ये तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये या आरोपींविरुद्ध 73/ 2018 या अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरा गुन्हा हा नगर तालुका पोलिस ठाण्यांमध्ये दाखल केला होता. दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये एकूण तीन आरोपी आहेत ते फरार आहेत.

सदर घटनेचा तपास करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिल्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर बँकेकडे कागदपत्रांची पडताळणी सुरू केल्यावर गुंड यांच्या पत्नी च्या नावाने सुधा कर्ज प्रकरण दुसऱ्या बँकेचे असल्याचे निदर्शनास आले होते त्यावरून त्यांनी त्याचा सर्च केला व संबंधित व्यक्ती या दिल्ली येथे राहत असल्याचे निदर्शनास आले ,आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पाठविण्यात आले ,दिल्ली येथे गेल्यानंतर कुणी म्हणावे अशी माहिती देत नव्हते त्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेचा ठावठिकाणा लावल्यानंतर ते दिल्ली येथे राहत असल्याचे आढळून आले. त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर शोधून काढल्यानतर  गुंड हा त्याच्या पत्नीची वारंवार संपर्कात असल्याचे लक्षात आले त्याची पत्नी ही काही काळ पुणे येथे राहायची तर काही काळ येथे राहायची असे  निदर्शनास आले .दिल्ली येथे पोलिसांनी संबंधितांचा पत्ता विचारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शक्कल लढवली या कधी ऑपरेटर आहोत तर कधी तर कधी कोरिअर वाले आहोत असे म्हणत त्यांनी गुंड चा शोध लावला व त्याला  दिल्ली येथून अटक केली.

सदरची कारवाई विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान साळुंखे राऊसाहेब कुसमुडे पी एम नाईक व मंगेश खरमाळे यांच्या पथकाने दिल्ली येथून जाऊन ही कारवाई केली आहे या प्रकरणांमध्ये गुंडे याचा साथीदार अमोल गाडेकर हा मात्र फरार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post