मेंढपाळ बांधवांना दहा हजार रूपये अनुदान देण्याची इंजि.डी.आर.शेंडगे यांची मागणी



 

      पारनेर(विशेष प्रतिनिधी)    सध्या राज्यात करोना परिस्थिती मध्ये मेंढपाळ बांधवांना जगण्यासाठी मदतीची नितांत आवश्यकता आहे. बाजार चालु नसल्याने मेंढ्यांना व्यवस्थित भाव मिळत नाही अशा परिस्थितीत मेंढपाळ पूर्णपणे कोलमडला आहे.दररोज पोटासाठी भटकंती करत असताना मेंढ्याना चारा व माणसांना पुरेसे अन्न व पाणी मिळणे कठीण झाले आहे.
  रानावनात फिरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महिला व मुलांची आरोग्याची परिस्थिती पैशाअभावी बिकट झाली  आहे.तरी या सर्व गोष्टींचा विचार  करून  मेंढपाळ बांधवांना दहा हजार रूपये  अनुदान देण्यात यावे अशी मागणी  पारनेर- नगर विधानसभा मतदारसंघाचे  वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार इंजि डी आर शेंडगे यांनी  पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रिडा व युवक       कल्याण  मंत्री  ना सुनील  केदार  यांच्याकडे ई-मेल द्वारे केली आहे.
  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post