रोहिदास दातीर यांच्या परिवारास आर्थिक मदतीचे आवाहन

राहुरी(विशेष प्रतिनिधी)
दक्ष पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रोहिदास दातीर यांची नुकतीच  अपहरण करून हत्या करण्यात आली. पत्रकार संघाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी अन्याया विरूध्द लढा उभारला. संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी घालविले. अत्यंत गरीब परिस्थितीमधूनही त्यांनी आपल्या लेखनीच्या माध्यमातून भ्रष्टाचार, अन्याया विरूध्द व्यापक लढा उभारला. परंतु त्यांच्या हत्येमुळे संपूर्ण कुटूंबांला मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. स्व रोहिदास  यांचा मुलगा सार्थक इ. ४ थी, तर मुलगी साक्षी इ. ११ वी मध्ये शिकत आहे.               रोहिदास दातीर हे दक्ष पत्रकार संघाचे आधारस्तंभ होते. तर दक्ष झुंजार वृत्तपत्राचे संपादक होते. एक जबाबदार नागरीक या नात्याने त्यांच्या कुटूंबाला आर्थिक सहकार्य व्हावे या उद्देशाने शक्य असेल त्यानुसार त्यांना भरभरून आर्थिक मदत करण्याचे आवाहन   करण्यात येत आहे. आपले कुटूंब समजून त्या परिवारास सढळ हाताने मदत करा. यासाठी सविता रोहिदास दातीर यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा-राहुरी येथे खाते असलेल्या बँकेचा खाते नंबर 37149924623, IFSC कोड SBIN0001042 यावर फोन पे, गुगल पे तसेच अकौंउंट ट्रान्सफर या द्वारे सविता रोहिदास दातीर, मल्हारवाडी रोड, दातीर वस्ती, राहुरी यांचा मो.नं. 8208494866 यावर अथवा समक्ष या परिवारास आर्थिक मदतीचे आव्हान करत आहोत. तरी रोहिदास दातीर यांचेवर प्रेम करणारे मित्र परिवार व दक्ष पत्रकार संघाचे सदस्य यांनी सढळ हाताने आर्थिक मदत करावी हि   दक्ष पत्रकार संघ परिवार तर्फे विनंती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post