पाथर्डी येथे कोवीड केअर सेंटरचे उद्घाटन

                  युवा नेते ऋषीकेश ढाकणे यांचा  कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात                       पााथर्डी (वार्ताहर)संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला असुन ग्रामीण भागातील अनेक गावं अजुनही तालुक्यात कोवीड सेंटर नसल्याने सुविधांपासून वंचित ठरले आहेत. मागील काही दिवसांपासून आलेल्या आकडेवारी नुसार अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांची आकडेवारी समोर आली आहे. परंतु शासकीय रुग्णालयातील गर्दी पाहता आपापल्या मतदारसंघातील नेत्यांनी पुढे जनतेसाठी कोवीड सेंटर उभारून मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा सर्वसामान्य लोकांमधून व्यक्त होत आहे. हीच गरज ओळखून शेवगाव पाथर्डी मतदार संघातील नागरिकांसाठी कोरोना उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी प्रताप काका ढाकणे यांच्या वतीने कै. सुमनताई ढाकणे कोवीड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. युवा नेते ऋषीकेश ढाकणे यांच्या नियोजनानुसार या कोवीड केअर सेंटर मध्ये कोरोना रूग्णांसाठी साठी सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. याप्रसंगी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मा. खा. सुप्रिया ताई सुळे यांनी आॅनलाईन मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी युवा नेते ऋषिकेश ढाकणे, पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नासिर भाई शेख, मा. जि. प. सदस्य शिवशंकर राजळे,मा.जि.प.सदस्य गहिनीनाथ शिरसाठ, डॉ. दिपक देशमुख, संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे, योगेश रासने,अभय गांधी, अविनाश मंत्री, उमेश मोरगावकर,मुकुंद गर्जे, नायब तहसीलदार नेवसे साहेब, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैभव दहिफळे, हुमायून आतार,बाळासाहेब घुले आदी मान्यवर उपस्थित होते. 
     शेवगाव पाथर्डी मतदार संघातील जनतेच्या सेवेसाठी तालुका पातळीवर कोवीड सेंटर उभारण्याचे आश्वासन केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मा. प्रतापकाका ढाकणे यांनी दिले होते. त्यानुसार पाथर्डी तालुक्यात कोवीड सेंटर उभारून त्यांनी कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करून तालुक्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचे कार्य केले आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post