कॉफी का सांडली ? :योगिता भिटे / टिक्कल

कॉफी का सांडली ? :-योगिता भिटे / टिक्कल
           

   चार वाजले सायंकाळची वेळ होती, म्हटल चला थोडी छानपैकी कॉफी घ्यावी.

कॉफी मीच बनवली दूसर कोणी घरी नव्हतच.😞
अथर्व अभ्यास करत होता.
 कपात कॉफी ओतली ..छानपैकी हातात पेपर घेतला,
अन जिन्यात एकटीच एक एक घोट सुरsss  करत पित होते.
     
    अचानक ऑनलाईन क्लास संपला आणि अथर्वने मागून येऊन पाठीवर थाप मारली.... तशी त्याचा खूप वेळ ऑनलाइन क्लास संपल्यावर रोजची सवय पाठीवर थाप किंवा मिठी मारणे.

     पण आज  कॉफी पिताना पेपरवर सांडली....

  कॉफी पेपरवर का सांडली..... ? असा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर.....

  हो , नक्कीच उत्तर येईल पाठीवर धक्का दिल्याने..  .. सांडली  . अजून काय ?

तुम्ही बरोबर सांगितले ?
नाही तुमचे उत्तर.. चुकीचे आहे.

तुम्ही म्हणाल कसे?  साधी गोष्ट आहे....
 कपात जर चहा असता.. तर चहा सांडला असता..
दूध असते... तर दूध सांडले असते.
 
 *याची आयुष्याशी सांगड घातली* *तर...* 

कपात ( मनात ) आत जे असते ते आपल्याला काही घटना / प्रसंग यामुळे हलले तर....... जे मनात ..ते reaction स्वरूपात बाहेर पडेल.

मग विचारा एकदा तुमच्या मनात ( कपात ) काय आहे  ?

आनंद, कृतज्ञता, शांती की नम्रता?.. की
राग, लोभ, कटुता, द्वेष, कठोर शब्द. ?

एकदा आपल आपल्याला हे कळल की.. धक्का लागला की काय बाहेर येते हे तुमच्यावरच अवलंबून... ह..

मग तुम्हीच निवडा कपात ( मनात ) काय ठेवायच ते.

 *आयुष्य हे सुंदर आहे ते जगता आले पाहिजे.* 


✍🏻 योगिता भिटे / टिक्कल
           शिरूर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post