महात्मा .फुले यांचे विचार, जगण्याला बळ देते ... " --- प्रा डॉ संतोष अ. तागड

म.फुले यांचे विचार, जगण्याला बळ देते आणि माणसातला मळ बाजूला करते... "
         --- प्रा डॉ संतोष अ. तागड
            नेवासे जि अहमदनगर
----------------------------------------------
      नेवासे (वार्ताहर)  सामाजिक समतेच्या अग्रणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी माणसातले माणुसपण जागा करण्याचे कार्य केले. एकोणिसाव्या शतकात इंग्रजीसारख्यांच्या बलदंड बाहूत गुंतलेल्या मिठीतून सामान्य जनतेला बाहेर काढले.
          सामान्यांना  आत्मपरीक्षणाची जाणीव महात्मा फुले यांनी करून दिली. समता आणि बंधुता हे सूत्रे समाजाच्या मनोमनी उतरण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मोडक्या संसाराला विचाराच्या मेढीलावून घरं उभी केली. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, वैचारिक या सर्व बाजूने यशस्वी लढा देण्याचं  कार्य महात्मा फुले यांनी केले. अस्पृश्यांच्या उद्धाराचे कार्य छत्रपती शाहू महाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यापूर्वी या महामानवांनी केले. 
         सत्यशोधक समाजाने  कृष्णराव भालेकर, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांची एक वेगळी चळवळ महाराष्ट्राच्या मुलुखमैदानी मातीत रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या ह्यातभर केला. स्त्री-पुरुष, उच्च-नीच यांच्या गर्तेत  गुतललेल्यांना  वा जातीबाह्य  टाकलेल्या माणसाला भटभिक्षुकांच्या विचारांचा  मूठमाती देण्याचे बळ दिले.दांभिकता पसरविणा-यांना सुळावरची पोळी खायला या क्रांतीसूर्याने भाग पाडले.  सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे या  उद्धारकर्त्यांच्या नवी पिढीचे उगमस्ञोत महात्मा फुले होय.स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्याच्या धगधगत्या निखा-याला  राष्ट्रीय आस्मितेची नवी झालर  महात्मा फुले यांनी दिली .अस्पृष्यासाठी आणि मुलींसाठी काढलेल्या शाळांनी समाजातली दरी दूर केली.. धनंजय कीर आणि उत्तम कांबळेंचे सामाजिक प्रबोधन याच पठडीतले आहे.पुण्यात आणि परिसरात केलेल्या कार्याचा भाग म्हणून पुणे येथील ' महात्मा फुले मंडई '  सांगता येते.. माञ ' फुलेवाडा ' जपायला पाहिले.  1968 ला राहुरी या ठिकाणी सुरू झालेल्या कृषी विद्यापीठाचे नामकरण 1969 ला 'महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी असे करण्यात आले आहे. त्यांचे गुलामगिरी,तृतियरत्न ,ब्रम्हणांचे कसब,शेतक-याचा आसूड ही व इतर ग्रंथसंपदा साठोत्तरी मराठी साहित्याचा  मूल केंद्रीय ठरते.छञपती शिवाजी महाराजांची  पहिली जयंती याच युगपुरुषाने 'शिवाजीचा पोवाडा' लिहून साजरी केली होती. 
महाराष्ट्राचे मार्टीन ल्युथर यांना जयंतीच्या निमित्ताने राजमाता पतसंस्था परिवारकडून विनम्र अभिवादन...
(अल्पसे चिंतन..)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post