अहमदनगर,(प्रतिनिधी) – राज्य सरकारने जाहीर केलेल्या वीकेंड लॉकडाऊनचा आज पहिला दिवस आहे. आज नगर शहरात कडक लॉकडाऊन पहावयास मिळत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मिशन ब्रेक दि चेन अंतर्गत होणाऱ्या या लॉकडाऊनमुळे संसर्ग कमी होण्याची शक्यता आहे.आज शहरात सर्व प्रमुख ठिकाणी रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे.नागरिकांनी घराबाहेर न पडता या लॉकडाऊन मधील निर्बंधांचे पालन केले असल्याचे चित्र दिसत आहे. पोलीस आणि प्रशासन या लॉकडाऊन यशस्वी करून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
Post a Comment