भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून गांधी कुटुंबीयांचे सांत्वन

  अहमदनगर(प्रतिनिधी)        भाजपच्या माजी  ग्रामविकास मंत्री सौ  पंकजा पालवे-मुंडे यांनी   आज माजी केंद्रीय मंत्री  स्व.दिलीप गांधी यांच्या कुटुंबाचे  सांत्वन केले . देवेंद्र या त्यांच्या निवासस्थानी सकाळी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण  केले.माजी केंद्रीय मंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे व दिलीप गांधी यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी माजी नगरसेवक सूवेंद्र गांधी, सरोज गांधी  यांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.यावेळी  खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले,दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, सरचिटणीस युवराज पोटे, आदी उपस्थित होते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post