राणी केदार यांना इतिहास विषयात पी.एच.डी.

राणी केदार यांना इतिहास विषयात पी.एच.डी.
नगर - राणी भास्कर केदार यांना इतिहास या विषयातील संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरची पी.एच.डी.प्राप्त झाली आहे. इतिहास  तज्ञ डॉ.प्रा.अंकुरा लक्ष्मण बेलवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अहमदनगर जिल्ह्यातील भिल्लांचा सामाजिक-आर्थिक अभ्यास’ या विषयासाठी राणी भास्कर केदार यांना हा बहुमान प्राप्त झाला आहे. यासाठी बाह्य परिक्षक म्हणून  डॉ.अरुणा मोरे यांनी काम पाहिले.
राणी केदार यांनी अथक परिश्रम व संशोधनातून नगर जिल्हा तसेच महाराष्ट्रातील विविध आदिवासी भागात जाऊन तेथील अनुभवातून हे  संशोधन मांडले. या प्रदीर्घ कामासाठी अनेकांचे सहकार्य त्यांना लाभले.
राणी केदार यांना मिळालेल्या पी.एच.डी.बद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. भविष्यातही आदिवासी व भिल्ल बांधवांच्या प्रगतीसाठी आपण  काम करणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post