किराणा भाजीपाला चढ्या भावाने विकणाऱ्यावर कारवाई करण्याची सरकारी वकील लगड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
अहमदनगर(प्रतिनिधी)सध्या कोरोणा महामारीची दुसरी लाट गंभीर असल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. सामान्य माणुस शारीरिक, मानसिक व आर्थिक दृष्ट्या हतबल झाला आहे.त्यात भाजीपाला व किराणा घेण्यासाठी सकाळी ७ते११ची वेळ निर्धारित केलेली आहे.हे फार चांगले झाले.मात्र या अल्प वेळेचा किराणा दुकानदारांनी गैरफायदा घेऊन चढ्या भावाने किराणा माल विकु नये म्हणून किराणा दुकानासमोर दर्शनी भागात किराणा मालाचा रास्त भाव दर्शवणारा फलक लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी संबंधितांना कराव्यात अशी मागणी सरकारी वकील सुरेश लगड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.आवश्यक आहे. विनाकारण ग्राहकांची अव्वाचे सव्वा लुट व्हायला नको म्हणून आपण आपल्या जिल्ह्यातील सर्व किराणा दुकानदारांना शासनाने निर्धारित केलेल्या रास्त भावाचा फलक दुकानाचे दर्शनी भागात लावणे बाबत आदेशीत करावे अशी माझी आम नगरकरांचे वतीने विनंती वजा मागणी आहे.तसेच सध्या भाजीपाला विक्रेतेही त्यांचा भाजीपाला अव्वाच्या सव्वा चढ्या भावाने विकत आहे.यावर देखील आपल्या अधिपत्याखाली पुरवठा अधिकारी यांनी नियंत्रण ठेवण्यासाठी टिम नियुक्त करावी असेही निवेदनात म्हटले आहे.
Post a Comment