नवनाथ ठोंबरे यांना उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रशस्तीपत्र .


 
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकात  नवनाथ  ठोंबरे यांना उत्कृष्ट काम केल्याबद्दल  प्रशस्तीपत्र .

अहमदनगर(प्रतिनिधी)
      नुकत्याच राज्यभरात झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२०-२१ मध्ये शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया निर्दोषपणे  पार पडावी यासाठी शासनाने जबाबदारी सोपवली होती.संवेदनशील व अतिसंवेदनशील निवडणूक केंद्रावर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्याचबरोबर निवडणूक प्रतिनिधी व आलेल्या मतदारांना ईव्हीएम मशीन बद्दलच्या रिडींग व प्रक्रियेबाबत माहिती देणे क्रमप्राप्त असते. 
       अशाच प्रकारची जबाबदारी चोखपणे पार पाडल्याबद्दल कोपरगाव महसूल प्रशासनाच्या वतीने नवनाथ आश्रु ठोंबरे यांना कोपरगाव दंडाधिकारी योगेश चंद्रे व उपविभागीय अधिकारी कोपरगाव गोविंद शिंदे यांच्या वतीने प्रशस्तीपत्र देण्यात आले. एन. ए. ठोंबरे साहेब हे सहकारी संस्था (दुग्ध) कोपरगाव याठिकाणी विशेष लेखापरीक्षक वर्ग -२ या पदावर कार्यरत आहेत.२०२०-२१ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या कालावधीत सोपविण्यात आलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांना हे प्रशस्तीपत्र देण्यात आले. 
     . एन. ए. ठोंबरे हे पाथर्डी तालुक्यातील मोहरी या मुळ गावचे आहेत. ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन त्यांनी विशेष लेखापरीक्षक परिक्षक म्हणून आपली नोकरी यशस्वीपणे सांभाळत अनेकांची कामे मार्गी लावली. अनेक संस्था, शासकीय बँकांचे लेखापरीक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. आपल्या कामाबद्दल निष्ठा आणि वक्तशीरपणा ही मुल्ये सांभाळत त्यांनी एक जबाबदार अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post