'आपले गाव आपला विकास ' कार्यक्रम ठरणार गावांची विकास संजीवनी .
पाथर्डी(वार्ताहर) २०२०-२१ ग्रामपंचायत निवडणुकांनंतर प्रत्येक गावातील नवनिर्वाचित सदस्य व सरपंच नविन कारभारासाठी सरसावले असतांनाच शासनाने निर्गमित केलेला १५ वा वित्त आयोग गावच्या मुलभूत विकासासाठी संजीवनी ठरणार आहे.मिळणार असलेल्या एकुण निधीपैकी ५0% निधी बंधित व ५० % निधी अबंधीत स्वरूपाचा असणार आहे. त्यामधून स्वच्छता, पेयजल पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, उपजिविका, महिला बालकल्याण, मागासवर्गीय कल्याण निधी व इतर कामांबाबत भरीव काम करण्यात येणार आहे. नुकताच सर्व ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या या शासन निर्णयामुळे अनेक गावांतील ग्रामपंचायती मधील कारभारास वेग आला आहे. विविध गणातील ग्रामपंचायतीस निधी खर्चाचे प्रशिक्षण देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही ग्रामपंचायतींना खर्चाचे आराखडा तयार करण्याचे आदेश दिले.
दि १६ मार्च २०२१ रोजी मोहोजदेवढे,ता:पाथर्डी येथील गावचा ' आपले गाव आपला विकास ' या शासनाच्या संकल्पनेनुसार इतर विकासकामां बरोबर शिक्षणांवर भर देत शाळा व अंगणवाड्या विकसित करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याठिकाणी बैठक घेण्यात आली. शाळा व अंगणवांड्या साठी सौर उर्जा सुविधा, संरक्षक भिंत, इ लर्निंग सुविधा, व्यायाम शाळा साहित्य,पेव्हिंग ब्लाॅक बसविणे,ग्रथालय,गॅस कनेक्शन, आहार शिजविण्याचे भांडे व इतर आवश्यक कामांबाबतचा आराखडा तयार करण्यात आला .यावेळी मोहोजदेवढे गावच्या सरपंच अर्चना हाके, ग्रामसचिव सचिन नजन, उपसरपंच मुक्ताबाई काटे, रामभाऊ देवढे, भाऊसाहेब देवढे, रामनाथ वाघमोडे,माजी सरपंच गणेश चितळकर, अजित देवढे,एकनाथ वाकचौरे, पंडित देवढे, सुधाकर ढोले आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्याध्यापिका मंजुषा वराडे, रावसाहेब कांबळे, महादेव गोल्हार यांनी आपापल्या शाळेत आवश्यक सुविधांचे मागणी प्रस्ताव तर अंगणवाड्या सेविकांनी आपापल्या मागण्या प्रस्ताव सरपंचाकडे सुपूर्द केले.यावेळी उषाताई रूपनर, चतुरा पांढरमिसे, बबिता पालवे, आशा रूपनर, शिल्पा लोखंडे, आशाबाई बेळगे, उज्वला रूपनर आदि महिला कर्मचारी उपस्थित होत्या. श्रीमती मंजुषा वराडे यांच्या वतीने उपस्थितांचे सत्कार करण्यात आले. शेवटच्या भाषणात 'आपले गाव आपला विकास ' या शासनाच्या उपक्रमास अभिप्रेत असलेल्या सर्व योजनांच्या आणी मागण्यांच्या अंमलबजावणी करण्यासाठी मी वचनबद्ध असल्याचे मोहोजदेवढे गावच्या सरपंच अर्चना हाके यांनी सांगितले .विकास आराखड्याची पहिलीच ग्रामपंचायत बैठक शांततेत पार पडली.
Post a Comment