नवोदितांनी शब्दगंध च्या उपक्रमात सहभागी व्हावे प्रा.डॉ.गणी पटेल

नवोदितांनी शब्दगंध च्या उपक्रमात सहभागी व्हावे प्रा.डॉ.गणी पटेल 
औरंगाबाद  : “मराठवाडा ही लेखक,साहित्यिक, कलावंताची भूमी असुन या भागातील नवोदितांना प्रेरणा मिळाल्यास निश्चितच त्यातुन पुढे नामांकित साहित्यिक निर्माण होऊ शकतील,” असे मत जेष्ठ पत्रकार प्रा.डॉ.गणी पटेल यांनी व्यक्त केले.                    
   शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य च्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यातील साहित्यिकांची समन्वय बैठक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती,त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, उपाध्यक्ष सुभाष सोनवणे,खजिनदार भगवान राऊत, प्रा.संजय पाईकराव,श्रीमती सुलभा मुंढे इ मान्यवर यावेळी उपस्थितीत होते.
      पुढे बोलतांना प्रा.डॉ.गणी पटेल म्हणाले कि, ‘मानवी जीवन समृद्ध होण्यासाठी लेखन वाचन आवश्यक असुन शब्दगंध च्या माध्यमातून ती आवड जोपासन्यासाठी प्रोत्साहन दिले जाते,त्यामुळे नवोदितांनी शब्दगंध च्या उपक्रमात सहभागी होणे गरजेचे आहे.’ 
    सुनील गोसावी यांनी शब्दगंध च्या स्थापनेचा इतिहास विशद करून औरंगाबाद जिल्हा कार्यकारी मंडळ व शाखा रचना बाबतीत माहिती दिली.१४ मार्च २०२१ रोजी औरंगाबाद येथे जिल्हास्तरीय काव्यसंमेलनाचे आयोजन करून यावेळी नवी कार्यकारिणी तयार करण्यात येणार आहे.यासाठी मो.क्र.९९२१००९७५० वर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी भगवान राऊत यांनी प्रास्ताविक केले,तर शेवटी पत्रकार डॉ.शेषराव पठाडे यांनी आभार मानले.या बैठकीला भास्कर निर्मळ,डॉ.यशवंत खडसे,प्रा.डॉ.ज्योती स्वामी,वसंत कुलकर्णी,अनिल सावंत,ए.जी. खिल्लारे,प्रशांत सुर्यतले,जोश्ना चव्हाण,प्रा.डॉ.अशोक कानडे,देविदास अंगरख इ मान्यवर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post