नगर ता, 22- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयाला भारत सरकारच्या विद्यापीठ अनुदान आयोगाकडून 2021- 22 पासून पुढील 10 वर्षकरिता स्वायत्त महाविद्यालय दर्जा घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली,
यावेळी संस्थेचे सचिव जे, डी, खान्देशे, विश्वस्त ऍड,विश्वासराव आठरे, रामचंद्र दरे, प्राचार्य भास्करराव झावरे आदी उपस्थित होते, झावरे म्हणाले की, यासाठीचा प्रस्ताव 29 ऑक्टोबर 2020 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे सादर केला होता, विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने सदर प्रस्ताव आपल्या शिफारशीसह 27 नोव्हेंबर रोजी मान्यतेकरिता विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठविला होता, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या स्थायी समितीने 11 फेब्रुवारीला स्वायत्त दर्जा देण्याकरिता महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन, शैक्षणिक कामगिरी, पायाभूत सुविधा, शिक्षकांची शैक्षणिक गुणवत्ता, विध्यार्थ्यांची गुणवत्ता, अभ्यासक्रम पूरक कामगिरी तसेच महाविद्यालयाची स्वायत्ततेची पूर्वतयारी, याचे मूल्यमापन करून दर्जा घोषित केला आहे, महाविद्यालयाने 2017 साली नॅक मूल्यांकन अ प्लस प्लस ग्रेड मिळाल्यामुळे महाविद्यालयाचा प्रस्ताव हाच समितीचा अहवाल ग्राह्य धरून सदर स्वायत्त दर्जा देण्यात आला आहे, महाविद्यालयास शैक्षणिक स्वायत्तता मिळाल्यामुळे यापुढे महाविद्यालयास पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणे, नविन अभ्यासक्रम सुरू करणे, मूल्यमापनाच्या पध्दती ठरविणे, परीक्षा घेणे व निकाल अधिसूचित करणे आदींचे अधिकार मिळतील, विद्यापीठाच्या धर्तीवर महाविद्यालयाच्या कामकाजाची देखरेख करण्याकरिता व कार्यवाही करिता नियामक मंडळ, विद्या परिषद, अभ्यास मंडळ, वित्त समिती सारख्या संविधानिक समित्या स्थापन करण्याचा अधिकार प्राप्त होईल,
Post a Comment