छत्रपती शिवाजी महाराजांना श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने अभिवादन
छतपती शिवाजी महाराजांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतेे - अॅड.अभय आगरकर
नगर - छत्रपती शिवाजी महाराज प्रजाहितदक्ष होते, आपल्या राज्यामध्ये प्रजेला कसलाही त्रास होता कामा नये याबाबत शिवाजी महाराज कमालीचे दक्ष होते. प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारे शिवाजी महाराज हे त्या काळात एक आगळेवेगळे राजे म्हणून गणले जात. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी असलेली परकियांची राजवट उलथून टाकून स्वत:चे राज्य निर्माण केले. हे त्यांचे महान कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यांच्या कार्यातून आपण प्रेरणा घेऊन कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष अॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त रामकृष्ण राऊत, विजय कोथिंबीरे, पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, गणेश राऊत, नामदेव दहिंडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
---------
Post a Comment