शिवरायांचे विचार आचरणात आणले पाहिजे - बाळासाहेब बोराटे

 

श्री संत सावताश्रम शिक्षण समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

शिवरायांचे विचार आचरणात आणले पाहिजे 

- बाळासाहेब बोराटे

नगर - छत्रपती शिवाजी महाराज प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे राजे होते, स्वराज्याची शपथ घेऊन स्वतंत्र स्वराज्य निर्माण केले. महाराजांचा हा आदर्श आपण घेतला पाहिजे.  शिवजयंतीला नुसता शिवरायांचा जयजयकार करण्यापेक्षा प्रत्येक दिवशी शिवरायांचे विचार आचरणात आणले पाहिजे.  शिवरायांचे भक्त आपण तेव्हाच शोभू  जेव्हा आपण एकत्र येऊन देशाच्या कल्याणासाठी  काम करू. आपल्या आयुष्याला स्फूर्ती देण्याचे महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आहे, असे प्रतिपादन श्री संत सावताश्रम शिक्षण समितीचे चेअरमन तथा नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.

श्री संत सावताश्रम शिक्षण समितीच्या महात्मा फुले विद्या मंदिर व सावित्रीबाई फुले विद्यालय यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन तथा नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मुख्याध्यापक राजकुमार शिंदे, राजीव घोलप, शिक्षक व कर्मचारीवृंद उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्याध्यापक राजकुमार शिंदे यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रसंग सांगितले. 

-------



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post