भाजपच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज व प.पू गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या माध्यमातून जगाला प्रेरणा मिळेल - भैय्या गंधे
नगर - छत्रपती शिवाजी महाराज व्यक्ती नसून एक विचार आहे. व्यक्ती नष्ट होतात पण विचार नष्ट होत नाही आणि अशा विचारांना घडविण्याचे काम राजमाता जिजाऊंनी केले. मातेकडून मिळालेले संस्कार व स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त केले. त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून त्याप्रमाणे वाटचाल केली पाहिजे. केंद्रातील भाजपा सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. या स्मारकाच्या माध्यमातून जगाला प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.
भाजपच्यावतीने लक्ष्मी कारंजा येथील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू गोळवलकर गुरुजी यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, उपमहापौर मालनताई ढोणे, ज्येष्ठ मार्गदर्शक सुनिल रामदासी, अनिल सबलोक, अजय चितळे, अॅड.विवेक नाईक, पंकज जहागिरदार, शिवाजी दहिंडे, वसंत राठोड, सुरेखा विद्ये, अंजली वल्लाकट्टी आदि उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अलौकिक गुणांमुळे व बुद्धिमत्तेमुळे आतापर्यंतच्या सर्व पिढ्यांचे आदर्श ठरलेले आहेत. आणि इथून पुढेही येणार्या पिढ्यांना ते कायम स्फूर्तिस्थानी राहणार आहेत. त्यांचे कार्य स्मरणात ठेवून त्याप्रमाणे आचारण केले पाहिजे, असे सांगितले.
यावेळी सुनिल रामदासी म्हणाले, एक आदर्श राजा, कुशल संघटक, लोककल्याणकारी राजा, नव्या युगाचा निर्माण करणारा, दुर्जनांचा नाश करता, सज्जनांचा कैवारी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख जगभर केला जातो. त्यांचे कार्य आपणासर्वांना प्रेरणादायी असेच आहे. हीच प्रेरणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेऊन राष्ट्र निर्माण कार्यास हातभार लावला आहे. यामध्ये गोळवलकर गुरुजींचे योगदान मोठे आहे. जनसामान्यापर्यंत संघाचे कार्य पोहचविण्याचे काम गुरुजींनी केले. आपणही राष्ट्र कार्यात सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.विवेक नाईक यांनी केले तर आभार अनिल सबलोक यांनी मानले. याप्रसंगी डॉ.विलास मढीकर, अभिजित ढोणे, अजय ढोणे, संदिप मुनोत, लक्ष्मीकांत तिवारी, आशिष आनेचा ज्ञानेश्वर काळे, तुषार पोटे, गोपाल वर्मा, सुनिता सामल, नम्रता सग्गम, ज्योती दांडगे, सुजाता औटी, संजय ढोणे, पुष्कर कुलकर्णी, निलेश जाधव, सुभाष जाधव आदिंसह कार्यकर्त उपस्थित होते.
--------
कृपया प्रसिद्धीसाठी आपला

Post a Comment