श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ असलेला
वाफगाव किल्ला राज्य संरक्षीत स्मारक होण्यासाठी सहकार्य करण्यासंदर्भात स्मारक समितीचे रयत शिक्षण संस्थेला निवेदन:-जऱ्हाड.
पुणे (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील
वाफगाव येथील "श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ" असलेली वाफगाव येथील ऐतिहासिक वास्तु ही राज्य संरक्षीत स्मारक म्हणुन घोषित व्हावे. या मागण्यांचे निवेदन रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील मुख्य कार्यालयात संस्थेचे सहसचिव संजय नागपुरे यांना स्मारक समितीचे पदाधिकारी भगवान जऱ्हाड यांनी दिले .
महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरातत्व विभागाकडे "श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर स्मारक संवर्धन समिती" साधारणतः २०१८ पासुन प्रयत्न करत आहे त्यामुळे याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे.श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ असलेली ही वास्तु एक अप्रतिम पर्यटनस्थळ व्हावे.पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा संपुर्ण जगापुढे आदर्शवादी ठरावी...
अशा काही उदारमतवादी दृष्टीकोनातुन ही वास्तु राज्य शासनाच्या अधिपत्त्याखाली जाऊन ते संरक्षीत स्मारक व्हावे...त्याची डागडुजी व्हावी...या वास्तुमध्ये "श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर" यांचा भव्य असा आश्वारुढ पुतळा उभारला जावा. हे एक आदर्श पर्यटन केंद्र व्हावे.. यासाठी श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर स्मारक संवर्धन समिती सर्वतोपरी प्रयत्न करत असुन याकामी शासनस्तरावर निधीसुद्धा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.... सारांश, या वास्तुच्या संवर्धनाची संपुर्ण जबाबदारी समितीने घेतलेली असुन वरील सर्वकामी रयत शिक्षण संस्थेने समितीस तसेच शासनास सहकार्य करावे... प्रसंगी ही वास्तु राज्य स्मारक होण्यासाठी शासनाकडे हस्तांतरीत करण्याचीही तयारी ठेवावी अशा आशयाचे निवेदन काल रयत शिक्षण संस्थेला स्मारक संवर्धन समितीच्या वतीने देण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेत या वास्तुत साधारणपणे १९५५ पासुन रयत शिक्षण संस्थेचे श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय सुरु आहे आणि त्यामार्फत ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे आदर्श कार्य घडत आहे. तेव्हा शाळेच्या कोणत्याही शैक्षणिक उपक्रमास कोणतीही बाधा न येऊ देता या वास्तुचे राज्य सरकारकडे हस्तांतर करावे असा प्रस्ताव स्मारक समितीचे महासचिव भगवानराव ज-हाड, सल्लागार बापुराव सोलनकर व कार्याध्यक्ष नवनाथ बुळे यांनी समितीच्या वतीने बैठकीत मांडला.
तसेच गेल्याच महिन्यात स्मारक समितीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे ही वास्तु रयत शिक्षण संस्थेकडुन प्रसंगी हस्तांतरीत करुन घेऊन राज्य संरक्षीत करावी अशी प्रमुख मागणी केलेली आहे....आणि हा प्रस्तावसुद्धा मा. मुख्यमंत्र्यांच्या विचाराधीन असल्याची माहिती सहसचिवांना या बैठकीत देण्यात आली.
तेव्हा संस्थेने लवकरात लवकर निर्णय घेऊन झालेला योग्य तो निर्णय स्मारक समितीस कळवावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी निवेदन स्विकारल्यानंतर हा विषय आम्ही त्वरीत संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या मॅनेजमेंट कौन्सील च्या मिटिंगमध्ये मांडुन झालेला निर्णय त्वरीत समितीला कळवला जाईल असे आश्वासन मा. सहसचिवांनी समितीला दिले.
हे निवेदन देताना स्मारक समितीचे महासचिव भगवानराव जऱ्हाड, कार्याध्यक्ष नवनाथ बुळे सरकार, उपाध्यक्ष युवराज तिखोले, समिती मुख्य सल्लागार डॉ अर्चना पाटील, बापुराव सोलनकर, मारुती जानकर, नवनाथजी पडळकर तसेच कोषाध्यक्ष योगेशराजे होळकर, उपाध्यक्ष तुकाराम सरोदे, खंडु तांबडे, संतोष वाघमोडे, दत्तात्रय गवते, योगेश धरम हे पदाधिकारी उपस्थीत होते..
Post a Comment