अहमदनगर: प्रा.डॉ.शिवाजी काळे यांच्या "गावकुसातल्या गोष्टी " या शब्दगंध प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ग्रामीण कथासंग्रहास कोल्हापूर जिल्ह्यातील,भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथील अक्षरसागर मंच चा राज्यस्तरीय पुरस्कार घोषित झाला आहे.
शब्दगंध प्रकाशन अहमदनगर संस्थेने प्रकाशित केलेल्या "गावकुसातल्या गोष्टी" मध्ये १४ ग्रामीण कथा आहेत. जेष्ठ साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये यांची दीर्घ प्रस्तावना लाभलेल्या या कथा नगर जिल्ह्यातील तेलकुडगाव, शेवगाव,श्रीरामपूर अशा ग्रामीण परिसर, बोलीभाषा, व्यक्ती, वास्तवदर्शी अनुभवशैलीतून आकाराला आलेल्या आहेत. आत्मपर अनुभव आणि व्यक्तीप्रसंगातून आलेल्या या कथा भावस्पर्शी आहेत.
'गावकुसातल्या गोष्टी 'या कथासंग्रहास नुकताच प्रकाश किरण प्रतिष्ठान, श्रीरामपूरचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
प्रा डॉ शिवाजी काळे हे राहाता येथील रयत शिक्षण संस्थेच्या शारदा ज्युनिअर कॉलेजमध्ये कार्यरत आहेत.ते नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील रहिवासी आहेत.त्यांच्या विशेष साहित्य पुरस्काराबद्दल शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे,प्राचार्य शिवाजीराव देवढे,प्रा.डॉ.शंकर चव्हाण, भगवान राऊत,डॉ बाबुराव उपाध्ये,मिराबक्ष शेख,कवयित्री शर्मिला गोसावी यांच्या सहअनेकांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment