ग्रामिण भागामध्ये दिवसा चो-या करणारा दहा वर्षापासुन फरार अट्टल गुन्हेगार
मुद्देमालासह जेरबंद,
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। अहमदनगर (प्रतिनिधी)
नारायण शिमाजी घोडके वय ४५, रा. पुराणीक कॉलनी, मिरजगांव, ता. कर्जत, जिल्हा अहमदनगर हे त्यांचे घर बंद करुन कामा निमित्त कुटुंबासह बाहेरगांवी गेले असतांना, कोणीतरी अज्ञात आरोपींनी त्यांचे बंद घराचे कुलूप तोडुन, घरामध्ये प्रवेश करुन घरातील रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण ७१,५००/- रु. किंमतीचा ऐवज घरफोडी चोरी करुन चोरुन नेला होता. सदर बाबत फिर्यादी यांनी कर्जत पो.स्टे येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ९५/२०२१ भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि श्री. अनिल कटके हे त्यांचे पथकार्तील अधिकारी व अमंलदार यांचे मदतीने सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना पोनि श्री. अनिल कटके यांना गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा अजिनाथ भोसले रा. हातवळण, आष्टी याने केला असून अजिनाथ भोसले हा रुईछत्तीशी, ता. नगर येथील बस स्टॅण्ड जवळ येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, संदीप घोडके, पोना/सुनिल चव्हाण, संदीप पवार, शंकर चौधरी,पोकॉ/जालिंदर माने, पोकॉ मेघराज कोल्हे, व चापोहेकॉ/उमाकांत गावडे यांनी रुईछत्तीशी येथे जावुन मिळालेल्या माहिती वरुन सापळा लावला त्यानंतर काही वेळातच एक इसम होंडा युनिकॉन मोटार सायकलवर बस स्टॅणंड जवळ येवुन, मोटार सायकल थांबवुन संशयास्पद रित्या आजुबाजूस टेहळणी करु लागला त्यावेळी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर संशयीत इसमास झडप घालुन मोटार सायकलसह ताब्यात घेतले त्यास पोलीस स्टाफ व पंचांची ओळख सांगुन त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव व पत्ता १) अजिनाथ विलास भोसले वय २८, रा. हातवळण, ता. आष्टी, जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले त्यांचेकडे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गुन्हया बाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यास त्याचे अंगझडतीचा उद्देश सांगुन पंचा समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये सोन्याचे मणीमंगळसुत्र, नेकलेस, कानातील कर्णफले, नाकातील नथ असे एकुण १,३३,०००/- रु. किंमतीचे ग्राम वजनाचे सोन्याचे दागीने तसेच ५०,०००/- रु. किंमतीची युनिकॉन मोटार सायकल क्र. एमएच/२३/एई/४१३५ असा एकुण १,८३,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुण आल्याने ते जप्त करुन ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या दागीन्याबाबत आरोपीकडे विचारपुस केली असता त्याने सदरचे दागीने हे मागिल १० ते १२ दिवसांपुर्वी मिरजगांव, ता. कर्जत येथील बंद घराचे कुलूप तोडुन चोरी केली असल्याचे सांगितल्याने कर्जत पो.स्टे गुरनं. १ ९५/२०२१ भादवि कलम ४५७, ३८० गुन्हयात निष्पन्न झाल्याने नमुद आरोपीस मुद्देमालासह कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे.
Post a Comment