:
टपाल कर्मचाऱ्यांच्या न्याय व प्रलंबित प्रश्नावर पाठपुरावा सुरूच
... राहाटे यांचे प्रतिपादन
अहमदनगर: टपाल कर्मचाऱ्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत याविषयी संघटनेच्या माध्यमातून सतत पाठपुरावा केला जात आहे शांत बसून किंवा नुसते बोलून समस्या सुटणार नाहीत त्यासाठी आता प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे असे प्रतिपादन नॅशनल फेडरेशन पोस्टल एम्प्लॉईजचे माजी सेक्रेटरी जनरल मा श्री टी एन राहाटे यांनी केले.
संघटनेच्या द्विवार्षिक अधिवेशनात ते बोलत होते.यावेळी संतोष यादव, आर एच गुप्ता, बी एस शिंदे,आर एच लांडगे,के एस पारखी,डी आर देवकर,पी एस शिंदे,एस डी जावळे आदी उपस्थित होते.
संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा पाठपुरावा करण्यासोबतच त्याच्या हिताचे निर्णय घेण्याचे आश्वासन त्यानी या वेळी दिले.
संघटना ही सभासदाचे हित जपण्यासाठी असते. एकमेकांचे उणेदुणे काढण्यासाठी संघटना नसते त्यामुळे सभासदांनी संघटित राहावे असे आवाहन संतोष यादव यांनी केले.
यावेळी पुढील दोन वर्षाकरिता कार्यकारिणी निवडण्यात आली अध्यक्षपदी श्री शिवाजी जावळे,कार्याध्यक्षपदी संतोष यादव तर विभागीय सचिवपदी संदीप कोकाटे यांची तर पोस्टमन संघटनेच्या अध्यक्षपदी नामदेव डेंगळे,विभागीय सचिवपदी प्रदिप सूर्यवंशी तर खजिनदार पदी शुभांगी शेळके यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शिवाजी जावळे हे होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संतोष यादव तर आभार प्रदर्शन प्रकाश कदम यांनी केले
फोटो, कॅपशन👇
पोस्टल संघटनेच्या द्विवार्षिक अधिवेशनाचे दीपप्रज्वलन करून उदघाटन करताना संघटनेचे राज्यसचिव आर एच गुप्ता समवेत टी एन रहाटे, संतोष यादव,रामभाऊ लांडगे,शिवाजी जावळे,पारखी,देवकर,शिंदे आदी.

Post a Comment