निशांत दिवाळी अंकाचे केंद्रीय मंत्र्यांकडून कौतुक




प्रतिनिधी, नगर

गेल्या 20 वर्षाची समृद्ध परंपरा लाभलेल्या निशांत दिवाळी अंकाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कौतुक केले. दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ आकर्षक असल्याचे सांगतानाच आठवले यांनी दिवाळी अंकाची परंपरा अशीच चालू ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे काल, शनिवारी नगर येथे आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहावर थांबले असताना त्यांची निशांत दिवाळी अंकाचे संपादक निशांत दातीर यांनी भेट घेतली. यावेळी दातीर यांनी मंत्री आठवले यांच्यासोबत चर्चा करतानाच यंदा प्रसिद्ध केलेल्या दिवाळी अंकामागील संकल्पना सांगितली. तसेच आठवले यांना अंक भेट दिला. आठवले यांनीही ही भेट स्वीकारली, व दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ पाहून त्याचे कौतुक केले. दिवाळी अंकाची परंपरा अशीच कायम ठेवा, अशा शुभेच्छाही यावेळी त्यांनी दिल्या.
याप्रसंगी दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद देखणे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम जोशी, इलेक्ट्रानीक मिडीया असोसिशनचे अध्यक्ष उमेर सय्यद यांच्यासह पत्रकार कुणाल जायकर, रोहित वाळके, अर्जुन राजापुरे, संतोष आवारे, स्वानंद पिंपुटकर, प्रेस फोटोग‘ाफर उदय जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.




....
म्हणून झाले मुखपृष्ठाचे कौतुक

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून करोना महामारीला सुरूवात झाली. करोनामुळे सर्वत्र भितीचे वातावरण होते. अनेकांना त्याचा आर्थिक फटका बसला. याकाळात प्रिंट मिडियाचे देखील मोठे नुकसान झाले. परंतु अशा अडचणीच्या काळामध्येही निशांत दिवाळी अंकाने आपली परंपरा कायम ठेवली. एवढचं नाही, तर या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठावर मास्कचे चित्र टाकत एकप्रकारे जनजागृती केली आहे. त्यामुळे या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाचे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून कौतुक होत आहे.
.....

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post