कॉ.का.वा.शिरसाठ यांना कॉ गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार जाहिर
अहमदनगर : शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कॉ.गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव टप्प्या येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लेखक कॉ.का.वा.शिरसाठ यांना जाहिर करण्यात येत आहे,अशी माहिती शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.
कॉ. गोविंदभाई पानसरे यांचा स्मृतीदिन शनिवार दि २० फेब्रुवारी २०२० रोजी असुन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत उत्तम कांबळे यांच्या हस्ते व रयत शिक्षण संस्था,सातारा चे उपाध्यक्ष अरुण कडु यांच्या अध्यक्षतेखाली कोहिनुर मंगल कार्यालयात स. १०/३० वा होणाऱ्या कार्यक्रमात सदर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.यावेळी शब्दगंध च्या वेबसाईट चे उद्घाटन होणार असुन ऍड.कॉ.सुभाष लांडे पाटील व स्मिता पानसरे उपस्थित राहणार आहेत.
कष्टकरी,श्रमिक,शेतकरी, शेतमजूर,असंघटित कामगार,शिक्षक यांच्यासाठी अविश्रांतपणे काम करणारे कॉ का.वा. शिरसाठ आपल्या नोकरीच्या काळात प्रबोधनासाठी विविध पत्रक प्रसिद्ध करत,त्यावर ते स्वतः चा ४०%पगार खर्च करत.अंधश्रद्धा निर्मूलन समिती,प्रगतिशील लेखक संघ,पुरोगामी विचारांच्या विविध संघटनांच्या लढ्याच्या अग्रभागी ते असत.ऊसतोडणी मजुर, महिला,कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतं. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल पुरस्कार निवड समितीने घेतली,त्यामुळे त्यांना हा पुरस्कार शनिवार दि २० फेब्रुवारी रोजी स १० / ३० वा.प्रदान करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे,ज्ञानदेव पांडुळे, संस्थापक सचिव सुनील गोसावी व भगवान राऊत यांनी केले आहे.
Post a Comment