आदरणीय पवार साहेब" आज एक गोपीचंद बोलतोय उद्या हजार गोपीचंद बोलले तर नवल नको - शशिकांत तरंगे - अध्यक्ष धनगर ऐक्य परिषद महाराष्ट्र राज्य.
राहुरी(महेश तमनर)
धनगर समाजातील युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतील नेत्यांच्या विरोधामध्ये आक्रमक का होतं आहेत याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार आहे की नाही ?
केवळ जो आक्रमक होतोय त्याला दोष देणे त्याच्या चुका काढणे आणि त्याला बदनाम करणे हा काही धनगर समाजाच्या प्रश्नावर ती काढलेला मार्ग नाही..
गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मजबूत असा मतदार आहे मग या समाजाला राजकीय सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच शरद पवार साहेब ,अजित पवार साहेब सुप्रियाताई सुळे, रोहित पवार हे धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना त्या त्या स्थानिक पातळीवरती तालुका असेल जिल्हा असेल राज्य पातळीवर ती वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये या समाजाच्या कार्यकर्त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये का घेतलं जात नाही
हा सुद्धा खऱ्या अर्थाने प्रश्न पक्षनेतृत्वाला विचारला पाहिजे हा धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान करायचं निवडून आणायचं आणि आपला पक्ष ही भावना फक्त आमच्या मनामध्ये ठेवायची का आणि तुम्ही त्या पक्षांमध्ये वेगवेगळी पदांवर केवळ मराठा समाजाला देऊन जातीय सलोखा निर्माण करण्याचं ज्ञान फक्त धनगर व बहुजनांना द्यायचं आणि महत्त्वाच्या पदांवर ती फक्त स्वतःच्या पै पाहुण्यांना बसवायचं हे कितपत योग्य आहे आज प्रत्येक समाजातील तरुण वर्ग हा राजकारणाची जवळीक साधून राजकारणातल्या डावपेचाचा तो अंदाज बांधतोय मग अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अनेक वर्षापासून जर आपण मतदार म्हणून काम करत असेल तर त्या पक्षाची जबाबदारी बनते धनगर समाजाला ज्याठिकाणी जिल्ह्याचा अध्यक्ष करणे आवश्यक आहे तिथे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष वेगवेगळी पार्टी लेवलची पद या कार्यकर्त्यांना मिळत नाहीत मिळतात ती कोणती सरचिटणीस उपाध्यक्ष मग या पदांना कोण विचारत नाही तो जर मराठा नसेल तर यांना बैठकीला सुद्धा कोण बोलवत नाही यांच कोण ऐकूनही घेतलं जात नाही मग अशा पदांचा काय उपयोग मराठीत ऐक म्हण आहे "उसाच्या चुई ला कोल्हा गुंतवल"
असेच प्रकार समोर येत आहेत म्हणून धनगर व बहुजन समाजाच्या तरुणांमध्ये चीड निर्माण होत आहे ती केवळ आणि केवळ धनगर समाजाला मिळणाऱ्या दुय्यम दर्जाच्या वागणुकीमुळेच ठीक आहे काही गोष्टी राजकारण म्हणून तुम्ही या समाजाचा वापर केला परंतु या समाजाकडे आज नेतृत्व करण्याचे खूप मोठे सामर्थ्य तरुणांमध्ये आहे या तरुणांना पुढे करण्यापेक्षा आपण फक्त पै पाहुणे आणि निर्णय प्रक्रियेमध्ये फक्त स्वतःच्या नातेवाईकांना सामावून घेणार असाल तर गोपीचंद पडळकर जे करतायेत त्यांचे समर्थन महाराष्ट्रातील धनगर समाजाने का करू नये ? हा प्रश्न देखील बहुसंख्य धनगर व बहुजन समाजाच्या तरुणांना पडतो एखादा दुसरा धनगर समाजाचा कार्यकर्ता नेता म्हणून पुढे आणायचा तो धनगर आहे एवढच फक्त त्याचं काम आहे जो तुम्ही धनगर नेता म्हणून पुढे आणता जो आमदार , मंत्री करता त्यांना समाजाचं काही देणं घेणं आहे का तो समाजाप्रती किती संवेदनशील आहे हा देखील प्रश्न समाजाला पडलेला आहे स्वतःच्या कुटुंबाकरता स्वतःच्या नातेवाईकांपुरता जर धनगर नेता तुम्ही केलेला जर काम करणार असेल तर धनगर समाजाने या गोष्टीच्या विरोधात बोलायचंच नाही का?
म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धनगर समाजाचा नेता पुढे करत असताना ज्याच्या मध्ये समाज -भान आहे ज्याला समाजाची जाण आहे जो समाजासाठी काहीतरी करु शकतो आणि ज्याला धनगर असल्याचा अभिमान आहे अशाच माणसाला नेतृत्व करण्याची संधी दिली पाहीजे का उगाच धनगर असल्याची लाज वाटते अशा नेतृत्वाला पुढे करून धनगर समाजाचे काही भले होणार नाही हा विचार आज धनगर समाजातील युवक अनुभवतायत
यातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भलं होईल आणि धनगर समाजाचं कोणीतरी आम्ही पुढे घेतलं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रभर मिरवायला मोकळा होईल एवढच काम तुमच्या माध्यमातून होईल बाकी समाजाचे प्रश्न तसेच राहतील व राहतात सुद्धा हे धनगर समाजाला नवीन नाही
जो तुम्ही घेतलेला धनगर नेता आहे त्यांची समाजाबरोबर जी नाळ आहे ती नाळ न जुळल्यामुळे समाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर येणार नाही हे मात्र निश्चित आहे
भाजप काय करते RSS काय करते हे राष्ट्रवादीला विरोध करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांना पुढे करते आहे काय यापेक्षा भाजपने जो धनगर समाजाच्या तळागाळात मध्ये पोहोचलेला धनगर नेता हेरला तसा धनगर नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये का नाही हे तपासले पाहीजे..
जे राष्ट्रवादी मध्ये काम करतात पण त्यांना राष्ट्रवादी जाणीवपूर्वक संधी देत नाही एखाददुसरे पद दिल्यानंतर प्रोटॉकल च्या नावाखाली त्या कार्यकर्त्यांना दाबलं जातं त्याचा आवाज दाबला जातो त्याचं मत विचारात घेतले जात नाही आणि नेहमीच बहुजन समाजाच्या मुलांना प्रोटोकॉल चा नवीन असा पगडा त्यांच्या डोक्यावर ती मारला जातो आणि आपल्या मात्र नातेवाईकांना कोणताही प्रोटोकॉल उरत नाही प्रोटोकॉल फक्त बहुजन समाजाच्या मुलांच्या बाबतीमध्ये वापरला जातो हे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसने विचारात घेतले पाहिजे..
अन्यथा आज एक गोपीचंद आपल्या विरोधात बोलतोय उद्या हजारो गोपीचंद या महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या विरोधात बोलायला तयार झाले राष्ट्रवादीतून बाहेर पडले तर राष्ट्रवादीला नवल वाटायला नको..
आपलाच
शशिकांत तरंगे
Post a Comment