सुनील गोसावी संपादित शब्द सावल्या प्रातिनिधिक कथा- काव्यसंग्रह प्रकाशन

 शब्दगंध नवोदितांना प्रेरणा देते :  प्रा.सिताराम काकडे 


सुनील गोसावी संपादित शब्द सावल्या प्रातिनिधिक कथा-  काव्यसंग्रह प्रकाशन

अहमदनगर : जगण्यातील निरसता संपवुन मानवी जीवन समृद्ध करण्या बरोबरच माणसं घडविण्याचे काम साहित्य  करते,यासाठी शब्दगंध नवोदित साहित्यिकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देते,ही अतिशय महत्वपुर्ण गोष्ट आहे,* असे मत साहित्यिक प्रा.सिताराम काकडे यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कोहिनूर मंगल कार्यालयात  सुनील गोसावी संपादित शब्द सावल्या प्रातिनिधिक कथा-  काव्यसंग्रह प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र उदागे हे होते,तर विचारपिठावर प्रा.डॉ. राधाकृष्ण जोशी,सुनील गोसावी, महाशिकारे,गांधी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. अनिल गर्जे हे होते,
पुढे बोलतांना प्रा.सिताराम काकडे म्हणाले कि,'एखादा छंद आपण जोपासला पाहिजे, त्यासाठी दिलेला वेळ वाया जात नसतो तर सत्कारणी लागतो, वाचनामुळे प्रगल्भता येते, संवेदनशील माणसं जग बदलू शकतात,'
डॉ.अनिल गर्जे म्हणाले की, 'ग्रामीण भागातील लिहित्या हातांना वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी करून घेऊन शब्दगंध त्यांच्यातील साहित्यिक जागता ठेवण्याचा प्रयत्न करत आहे,'
अध्यक्षपदावरून बोलताना राजेंद्र उदागे म्हणाले ,'कोविड मुळे यावर्षी शब्दगंध संमेलन झाले नाही ही खंत असुन पुढील वर्षी सर्व समावेशक कार्यक्रम घेऊ, सध्या ऑनलाईन उपक्रम राबविण्यात येत आहेत,'
       कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ.अशोक कानडे यांनी केले,सुत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी केले तर शेवटी बबनराव गिरी यांनी आभार मानले,कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन सामाजिक अंतर राखुन झालेल्या कार्यक्रमास  प्रा.तुकाराम गोंदकर, राजेंद्र फंड, राजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते,

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post