शासकीय गुन्हा दाखल करावा यासाठी
अरुण रोडे यांचा उपोषणाचा दूसरा दिवस.
सैनिक बँकेतील निराधार योजना रक्कम अपहार व अन्य प्रकरण.
नाशिक -पारनेर सैनिक सहकारी बँकेत शासकीय अनुदान हडप झाल्याने सहकार आयुक्त यांच्या पत्राची जिल्हाधिकारी यांनी सदर गंभीर दखल घेऊनही कर्जत तहसीलदार व पोलिस निरीक्षक हे शाखाआधिकारी व संचालक मंडळाला पाठीशी घालत असून शासकीय गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याने संबधितावर आधिकाऱ्यावर कारवाई व्हावी व शासकीय रक्कम हडप करणाऱ्या सैनिक बँक अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल होण्यासाठी नाशिक आयुक्त कार्यालय येथे अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे नगर जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, जिल्हा सचिव श्री.वैभव पाचारने, पारनेर तालुका अध्यक्ष पप्पू कासोटे,भरत हाटावकर, बाळासाहेब धरम, बसले आहेत. बुधवारी त्यांचा दूसरा दिवस होता.
सविस्तर माहिती अशी की पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक शाखा कर्जत येथे शाखाआधिकारी,क्लार्क यांनी संगनमताने व वरिष्ठांच्या आशीर्वादाने संजय गांधी निराधार योजनेतील बँकेत जमा होणाऱ्या रक्कमेत अपहार केल्याची तक्रार वैभव पाचारने यांनी जिल्हाआधिकारी यांना केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेतील घोटाळ्याची दखल घेऊन सहकार आयुक्तांना विशेष लेखापरीक्षका मार्फत सखोल तपासणी करण्याचे पत्र दिले होते. विशेष लेखापरीक्षक अहमदनगर यांनी आयुक्त यांच्या पत्राने तपास करून तसा अहवाल सहकार आयुक्तांना दिला होता त्यावर सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी सैनिक सहकारी बँक शाखा कर्जत या शाखेत संजय गांधी निराधार योजनेत अपहार झाला असून संबंधितावर शासकीय गुन्हा दाखल करून सखोल तपास करण्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे. असे असतानाही शासकीय गुन्हा का दाखल होत नाही?
तसेच सुरेश किसन रासकर व सुंनदा रभाजी शेळके यांची जमीन बेकायदेशीर रित्या लीलाव केला आहे.त्या बाबत सहकार खात्याच्या तपासणीत दोषी आढळूण येऊन व पोलिसांनी जबाब नोंदवूनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने त्वरीत गुन्हा दाखल व्हावा.
सैनिक बँकेतील १० कर्मचाऱ्यांचे पारनेर पोलिस स्टेशनला जबाब नोंदण्यात येऊनही गुन्हा का दाखल करत नाही?
सैनिक बँकेत शासकीय सरचार्ज रक्कमेत अपहार झाल्याचा स्पष्ट अहवाल असूनही गुन्हा का दाखल होत नाही?अजित यशवंत वाळुंज व मोहन कुशाबा चौधरी यांचे बोगस कर्जाबाबत उच्च न्यायालयाने आदेशीत करून पारनेर पोलिस स्टेशन येथे जबाब नोंद होऊनही गुन्हा का दाखल होत नाही?
ढवळपुरी येथील १३७ एकर जमीन बोगस व्यक्ती उभी करून जमीन हडप करण्यामध्ये तत्कालीन तलाठी, मंडलाधिकारी,दुय्यम निबंधक पारनेर, यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मध्ये सामील असलेले सैनिक बँकेचे चेअरमन शिवाजी व्यवहारे , मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांचे वर गुन्हा दाखल व्हावा.
सैनिक बँक चेअरमन शिवाजी व्यवहारे , मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे या जोड गोळीने व संचालक यांनी नियमबाह्य स्व:ताच्या मुलांना(नातेवाईक) यांना बँक सेवेत घेतल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी. सैनिक बँकेत आर्थिक गैरव्यवहार असुन ज्या ज्या प्रकरणात सहकार खात्याचा दोषी असल्याचा अहवाल आला आहे त्या प्रकरणाची
आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करावी या मागण्या व इतर काही सामाजिक मागन्यासाठी दुसऱ्या दिवशी ही
उपोषण सुरु असल्याचे अरुण रोडे यांनी सांगितले

Post a Comment