ओबीसीच्यावतीने नगरमध्ये 23 रोजी महामेळाव्याचे आयोजन
नगर - ओबीसी हक्क परिषदेच्यावतीने सोमवार दि.23 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वा. नंदनवन मंगल कार्यालय, टिळकरोड, नगर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या पार्श्वभुमीवर आज निवडक कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीस समता परिषद, जयभगवान महासंघ, नाभिक महामंडळ, तेली समाज संघटना, धनगर महासंघ, मल्हार सेना, ओबीसी परिषद, सावता परिषद, कुंभार समाज, सोनार समाज, गुरव समाज, चांभार समाज, फुले ब्रिगेड, सावता युवक आदिं संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीस मार्गदर्शन करतांना जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे म्हणाले की, ओबीसी समाजातील 371 वेगवेगळ्या जाती समाजाला संघटीत करुन राज्यपातळीवर या समाजाला न्याय देण्यासाठी जिल्हानिहाय बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई येथे राज्यातील सर्व ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांची गोलमेज परिषद नुकतीच संपन्न झाली. राज्य पातळीवरील नेत्यांनी आता जिल्ह्यातील ओबीसी संघटनांना एकत्र करुन जनजागृती करण्याचे सांगितले आहे. नगर जिल्ह्यात येत्या 23 तारखेला सर्व ओबीसी समाजातील घटकांनी संघटीतपणे ताकद दाखवून आपल्या न्याय हक्कासाठी आवाज उठविण्याची गरज आहे. ओबीसी समाजामध्ये सर्व जाती समुहांच्या विविध मागण्या एका झेंड्याखाली मांडण्यात येणार आहेत.
याप्रसंगी ओबीसीचे नेते अशोकराव सोनवणे म्हणाले की, ओबीसी प्रवर्गामध्ये यापूर्वीच 350 हून अधिक छोट्या-मोठ्या जाती समाविष्ठ आहेत. नव्याने या प्रवर्गामध्ये कोणालाही घुसू देऊ नये; म्हणून या पुढील काळात ओबीसींच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी संघटीतपणे एकमुखी लढा उभारण्याची गरज आहे. सर्व बारा बलुतेदार व ओबीसींनी यापूर्वी राज्यात अनेक दिशादर्शक आंदोलने केली आहेत. या राज्यातील आंदोलनाला नगर जिल्ह्याने सर्वात प्रथम हाक दिली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील मेळावा राज्याला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जय भगवान महासंघाचे आनंद लहामगे म्हणाले की, ओबीसींच्या न्याय हक्कासाठी औरंगाबाद येथे 5 डिसेंबर येथे राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यासाठी जय भगवान सेनेने तालुकानिहाय बैठका सुरु केल्या आहेत. जिल्हा पातळीवरील मेळाव्यानंतर औरंगाबादच्या मेळाव्यालाही सर्वांनी संघटीतपणे उपस्थित रहाणे गरजेचे आहे.
धनगर समाजसेवा संघाचे काका शेळके म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी महिलांना व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे, या ओबीसी मेळाव्यामध्ये महिलांची संख्या निश्चितच लक्षणिय दिसली पाहिजे, यासाठी प्रत्येक ओबीसी संघटनेने महिलांना मेळाव्यास घेऊन येण्याची विनंती केली.
या बैठक़ीस शरद झोडगे, दत्ता जाधव, बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, रामदास आंधळे, अर्जुन बोरुडे, हरिभाऊ डोळसे, राजेश सटाणकर, रमेश सानप, बाबा सानप, प्रा.माणिकराव विधाते, सुभाष लोंढे, अशोक तुपे, अनिल बोरुडे, जालिंदर बोरुडे, अशोक दहिफळे, नितीन शेलार, निशांत दातीर, मंगल भुजबळ, परेश लोखंडे, नितीन डागवाले, विशाल वालकर, अशोक कानडे, डॉ.श्रीकांत चेमटे, किरण बोरुडे, उमेश शिर्के, युवराज पोटे, तुषार पोटे, विनय देवतरसे, संतोष हजारे, अमित खामकर, संजय गारुडकर, गोरख फुलारी, संदिप हजारे, रावसाहेब भाकरे, निलेश पवळे, रामदास साळूंके, अनिल इवळे, विकी कबाडे, ब्रिजेश ताठे, किरण जावळे आदिं उपस्थित होते
Post a Comment