धनगर समाज

 


धनगर समाज 
इतिहास (निशांत दातीर,जिल्हाध्यक्ष धनगर समाज सेवा संघ, अहमदनगर संपर्क ९८५०२०३७४५)

पार्श्‍वभूमी

     ही भटकी जमात महाराष्ट्रात सर्वत्र विखुरलेली असून त्यांची मातृभाषा मराठी आहे. त्यांचे दैवत जेजुरीचा खंडोबा असून नेताळे येथील मातोबा आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध आहे. या दोन्ही देवता पाळीव प्राण्यांच्या रक्षणासाठी तसेच  नवसाला पावणार्‍या आहेत.

व्यवसाय

     या जमातीचा पिढीजात धंदा ‘मेंढपाळ’ हाच असून व्यवसायासाठी सात-आठ महिने भटक्याचे जीवन जगावे लागते. मेंढ्यांपासून लोकर मिळविणे, लोकर विकणे, त्याच लोकरीपासून धोंगड्या, कांबळे, जीन तयार करणे या व्यवसायात हे लोक आहेत. स्त्रिया देखील त्याच व्यवसायात मदत करताना आढळतात. मेंढपाळी व्यवसायात वनविभागातून होत असलेल्या त्रासामुळे व्यवसाय उद्धवस्त होत चालला आहे. चराई कुरणांचा प्रश्‍नही गंभीर आहे. राज्य शासनाकडून चराई कुरण पास देण्याबाबतही उदासिनता असते.

वास्तव्य

     सातारा, सांगली, नगर, नाशिक, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर तर धुळे, जळगांव, औरंगाबाद, नागपूर यासारख्या जिल्ह्यातून कमी अधिक प्रमाणात आढळतात. जवळजवळ दोन-तीन लाखांपर्यंत यांची लोकसंख्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

संस्कृती

     हिंदू धर्मिय असून, मराठी मातृभाषा आहे. देवादिकांवर प्रगाढ विश्‍वास असून, अंधश्रद्धाळू आहे. पुरुष शर्ट, धोतर, फेटा असा पेहराव करतात तर स्त्रिया लुगडे, चोळी परिधान करतात.

यात्रा / जत्रा

     जेजुरी येथील ‘खंडोबा’ नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील वेताळे येथील ‘मातोबा’ची  यात्रा हे यांचे प्रमुख यात्रा ठिकाण. या देवतांचा उपवास रविवारी करतात. यांना प्रसन्न करण्यासाठी प्राण्यांचा बळी दिला जातो.

घरे/निवास

     पूर्वी भटकत राहण्याच्या वृत्तीमुळे स्थलांतर करावे लागत असल्याने हे ताडपत्री तंबूचा वापर करीत. कालामानातील बदलामुळे शेतीकडे वळलेले दिसतात. त्यामुळे स्थलांतरित जीवनमान बदलून स्थानिक होण्याकडे कल. त्याचा परिणाम शेतीमुळे खेड्यांतून आणि शहरांतून कमीअधिक प्रमाणावर वास्तव्य होऊ लागल्यामुळे बर्‍याच ठिकाणी पक्की घरे बांधून राहू लागल्याचे मोठ्या प्रमाणावर दिसून येते.

शिक्षण

     जीवनात थोडेफार स्थैर्य निर्माण झालेले दिसताच मुला-मुलींच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष पुरवितात असे दिसून येते. पूर्वी मात्र शिक्षणाचे प्रमाण अतिशय अल्प होते, परंतु जसजशी अस्थिरता येऊ लागली तसतसे शिक्षणाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होऊ लागल्याचे दिसून येते.

लग्नविधी

     लग्नविधी संपूर्णपणे हिंदू धर्मीय असलेला दिसतो. अर्थात आजही समाजात त्यांच्या रुढी आणि पंरपरांना अनुसरुन बालविवाह करण्याची पद्धती आहेच.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post