भिस्तबाग महाल पर्यटन स्थळ बनवावे
अहमदनगर : ऐतिहासिक वास्तू म्हणुन प्रसिद्ध असलेला भिस्त बाग महाल कोणाच्या ताब्यात आहे? असा प्रश्न इतिहासप्रेमींना पडत असुन अहमदनगर महानगर पालिका प्रशासनाने हा महाल ताब्यात घेऊन येथे पर्यटन स्थळ उभारावे,असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी यांनी केले आहे,
सध्या या महालाजवळ कोणताही फलक दिसुन येत नसुन या ऐतिहासिक वारसा असलेल्या महालात उनाडक्या करणारांचे टोळके कायम बसलेले असते,दुपारी काही वेळासाठी पोलीस व्हॅन येथे असते तेव्हा कोणी येथे फिरकत नाही, या महालाच्या भिंतीवर बाटल्यांच्या काचा दिसून येतात,येथील दगडी बांधकाम निसटल तर काही दुर्घटना घडू शकते,भिस्तबाग महाला जवळून तपोवन रोड चे काम चालू झालेलं असुन आता या रस्तावर रहदारी वाढणार आहे, त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे, भिस्तबाग महाल हा ऐतिहासिक वास्तू च्या यादीत आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे, कारण येथे कोणत्याही प्रकारचा बोर्ड नाही,त्यामुळे कोणीही या वास्तुवर हक्क सांगू शकतो, येथे अतिक्रमण ही होऊ शकते,अहमदनगर शहराच्या वैभवात भर घालनारा भिस्तबाग महाल आहे,
वास्तु कलेचा उत्तम नमुना असलेली भिस्तबाग महाल इमारत हळूहळू लयाला जाण्याची शक्यता आहे, त्या अगोदर काहीतरी करणे गरजेचे आहे,पुरातत्व विभागाचे अहमदनगर शहरात जर अधिकारी असतील तर त्यांनी भिस्तबाग महालास भेट देऊन सध्य परिस्थिती जाणुन घेणे आवश्यक आहे,
या ठिकाणी थंडगार खेळती हवा कायम स्वरूपात येत असते,अनेक लोक सकाळी फिरायला या परिसरात येतात,येथे वृक्ष लागवड,फुलझाडे लागवड केल्यास येथील वातावरण सुशोभित होईल,तरी अहमदनगर महानगर पालिका प्रशासनाने सदर महाल ताब्यात घेऊन येथे पर्यटन स्थळ विकसित करावे असे आवाहन करण्यात येत आहे

Post a Comment