काँग्रेसची नगरमध्ये सह्यांची मोहिम

 शेतकरी-कामगार विरोधी कायदा रद्द करण्यासाठी


काँग्रेसची नगरमध्ये सह्यांची मोहिम

     नगर - केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी  कामगार विरोधी कायद्यास विरोध करण्यासाठी येथील मार्केट यार्डबाजार समिती आवारात  .नगर शहर  भिंगार काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने सह्यांची मोहिम सुरु करण्यात आलीया मोहिमेत नगर शहरातून 10 हजार सह्यांचे उदिष्ट्ये निश्चित करण्यात आले आहेया मोहिमेत कार्यकर्त्यांसमवेत शेतकर्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत केंद्र सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.

     प्रारंभी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस उबेद शेख यांनी या आंदोलनाची पार्श्वभुमी स्पष्ट केलीशहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यावेळी म्हणालेभाजप प्रणित केंद्र सरकारचा हा नवा कायदा शेतकरी  कामगार विरोधी असूनया कायद्यामुळे बाजार समितीचे आस्तित्व नष्ट होणार आहेत्यामुळे शेतकर्यांची हक्काची बाजारपेठ राहणार नाहीतर भिंगार अध्यक्ष ॅड.आर.आर.पिल्ले यावेळी म्हणालेकार्पोरेट कंपनीला मोठा नफा मिळवून देणार्या या कायद्याने शेतकर्यांना मात्र कमी भावात माल विकावा लागला तर ग्राहकांना जादा दराने शेतीमाल खरेदी करावा लागेलएकाचवेळी शेतकरी आणि ग्राहकांना मोठा आर्थिक फाटका बसून कार्पोरेट कंपनीच्या घशात मोठी रक्कम मिळणार आहे.

     पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज खान यावेळी म्हणालेया कायद्यामुळे देशातील शेतकरी आणि कामगार देशोधडीला लागणार आहेत आता तरी डोळे उघडाअन्यथा भाजपप्रणित केंद्र सरकार हुकुमशाही लादत देशातील जनतेला गुलाम बनवत आहे.

     या मोहिमेत प्रदेश सदस्य शामराव वाघस्करपक्षाचे शहर उपाध्यक्ष  माजी पोलिस उपनिरिक्षक एम.आय.शेखमाजी नगरसेवक रुपसिंग कदमसुभाष रणदिवेप्रदेश सदस्या श्रीमती शारदा वाघमारेरजनी ताठेसौ.मीना धाडगेसौ.किरण आळकुटे,   महेश घोरपडे,  संतोष कांबळेजरीना पठाणॅड.नरेंद्र भिंगारदिवेअन्वर शेख,  निजाम पठाणसंजय झोडगेविजय आहेरराजेश बुंदेलेबबन सावंत,  योगेश कवेकरपरमेश्वर पठाणप्रकाश साळवे,अर्जुन गायकवाडआनंद आव्हाडरवी सूर्यवंशीडि.जी.भांबळ आदि सहभागी झाले होते.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परवेश झकेरिया  फजलसर यांनी केले तर शहर सरचिटणीस अभिजित कांबळे यांनी आभार मानले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post