आज खूप दिवसांनी टेंभीच्या खंडोबाच्या दर्शनाचा योग घडून आला आज रविवार होता ( 8--9--2024 )
मार्केटला सुट्टी असल्यामुळे घरीच होतो मी घरी असल्यावर लहान नात माझ्या हाताला धरून खाली पटांगणात खेळायला चला म्हणून मला ओढत रहाते मला पण नातीची आवड पूर्ण करावी लागते नातीला बरोबर घेऊन मी टेंभीच्या खंडोबाच्या दर्शनाला गेलो नगर औरंगाबाद हायवेवर वांबोरी फाट्यापासून जवळच एका डोंगरावर टेंभीचा खंडोबा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे सुद्धा टेंभीच्या खंडोबाला दर्शनाला येत असल्याचा उल्लेख आहे छत्रपती शिवाजी महाराज पण ह्या ठिकाणी दर्शनाला येऊन गेल्याचा उल्लेख सापडतो प्राचीन मंदिर आहे गेली पन्नास वर्षापासून मी टेंभीच्या खंडोबाच्या दर्शनाला येत आहे या मंदिराचे व माझे खूप आगळे वेगळे नाते आहे या मंदिराच्या व डोंगराच्या काही आठवणी 50 वर्षे झाली तरी माझ्या मनात घट्ट घर करून बसल्या आहेत माझे मामा अण्णा साहेब शिकारे हे मंदिराच्या डोंगराच्या पायथ्यालाच राहत होते त्यावेळी मी सोनई येथे राहत होतो तेव्हापासून खंडोबाच्या यात्रेला मी कायम येत आहे त्यावेळी घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती मार्गशीर्ष महिन्यात सटीला टेंभीच्या खंडोबाची यात्रा भरते यात्रेच्या आदल्या दिवशी मी मामाच्या घरी मुक्कामी येत असे यात्रेच्या आदल्या दिवशी दुपारीच मी -- मामा व गावातील इतर सवंगडी डोंगराच्या पायथ्याला एकत्र जमायचं जे यात्रे करू दुकानदार यात्रेसाठी यायचे त्यांच्याजवळ खूप सामान असायचे त्यावेळी आत्ताच्यासारखा डोंगरावर जाण्यासाठी रस्ता नव्हता नगरच्या बाजूने दगडी पायऱ्या चा रोड होता ह्या पायऱ्यावरून डोंगरावर चढणे मोठे अवघड काम होते मामा व मी यात्रेकरू-- दुकानदारांच्या जवळचे अवजड सामान डोक्यावर घेऊन डोंगरावर पोहच करायचो त्या बदल्यात 25--50 पैसे मोबदला मिळायचा रात्र होईपर्यंत दोन-तीन खेपा व्हायच्या त्या बदल्यात दीड दोन रुपये मिळायचे यात्रेला घरून येताना आई एक रुपया मला यात्रेसाठी द्यायची परंतु मी ते पैसे खर्च करीत नसे डोंगरावर सामान पोहच करून जे पैसे मिळायचे तेच पैसे मी दुसऱ्या दिवशी यात्रेत खेळणी तसेच गरम जिलेबी गोडी शेव व शेव घेण्यासाठी खर्च करायचं डोंगरावर एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या दगडावर बसून गरम जिलाबी व शेव खाण्याचा आनंद खूप आगळावेगळा असायचा एवढं भरपेट खाऊन सुद्धा पैसे शिल्लक राहायचे घरून आणलेले पैसे व यात्रेत खर्च करून शिल्लक राहिलेले पैसे आईच्या वडिलांच्या हातात देताना खूप उर भरून यायचा वयाच्या सातव्या आठव्या वर्षीच स्व: कमाई काय असते हे अनुभवायला मिळाले तुमचे शिक्षण जरी कमी असले तरी स्व: कमाईतील पैसे कसे खर्च करायचे याचे ज्ञान अनासायास प्राप्त होते मी आजही व्यवहारिक जीवनात पैसा कुठे खर्च करायचा याचा सारासार विचार करूनच निर्णय घेतो आज पन्नास वर्षे होऊन गेली त्यावेळी कष्टातून जे एक दोन रुपये मिळायचे त्याचे मोल आजही खूप मोठे वाटते
कोरोनाच्या काळात मी दररोज सकाळी खंडोबाच्या डोंगरावर सकाळी फिरायला जात असे मंदिराच्या डाव्या बाजूची भिंत पडली होती तसेच पावसात मंदिर गळत होते सर्वजण मंदिराच्या बांधकामाची चर्चा करायची परंतु पुढाकार कोणी घ्यायचा? आमच्या घरी पण खंडोबाच्या मंदिराची चर्चा झाली आई मला म्हणाली मंदिराचे बांधकाम करा मी नगरचे इंजिनिअर आणून त्यांना मंदिर दाखवले व त्यांचा सल्ला घेतला हे जुने मंदिर पाडून नवीन बांधायचे की ह्या जुन्याच मंदिराचे बांधकाम करायचे मंदिराला पाचशे वर्षे होऊन गेली पूर्ण मंदिर दगडी बांधकामात आहे बऱ्याच जणांचे विचार हेच आले जुनेच मंदिराचे बांधकाम करून जीर्णोद्धार करू इंजिनीअरच्या सल्ल्याप्रमाणे मंदिराच्या डाव्या साईडची भिंत पाडून त्याच दगडातून पुन्हा नवीन भिंत बांधली व मंदिराच्या छतावर वॉटरप्रूफ सिमेंटचा वापर करून बांधकाम पूर्ण केले मंदिराला पूर्ण पिवळा कलर दिला प्रति जेजुरीचा गड अशीच ओळख टेंभीच्या खंडोबाची आहे त्यावेळी मी माळवी पिंपळगाव धनगरवाडी शेंडी व वडगाव येथील सर्व खंडोबा भक्तांना निमंत्रित केले होते त्यावेळी मी सर्वप्रथम देणगी देऊन मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली बांधकाम चालू झाल्यावर खूप भावी भक्तांनी आर्थिक मदत केली सर्वांच्या सहकार्यातून आज खूप भव्य व दिव्य मंदिर निर्माण झाले आहे डोंगरावर एका स्वयंसेवी संघटनेने 150 वडाची झाडे लावली आहेत झाडाचे संगोपन खूप चांगले झाले आहे डोंगरावर जाण्यासाठी चांगला रस्ता निर्माण केला आहे सकाळ व संध्याकाळी नगर व आसपासच्या परिसरातील खूप जण फिरण्यासाठी-- व्यायामासाठी डोंगरावर येतात मंदिराच्या समोरच नवीन भोजनगृह बांधले आहे महिन्यातील पहिल्या व तिसऱ्या रविवारी आमटी भाकरीची पंगत असते डोंगराच्या कडेला बसून थंड स्वच्छ हवेत निसर्गरम्य वातावरणातआमटी भाकरीचा स्वाद खूपच रुचकर लागतो खूप भाविक दर्शनाच्या निमित्ताने येत असतात नगरकरांसाठी एक खूप रमणीय व टुरिझम पॉईंट म्हणून टेंभीचा खंडोबा प्रसिद्ध झाला आहे डोंगरावरून नगर वडगाव धनगरवाडी जेऊर माळवी पिंपळगाव व गोरक्षनाथाचा डोंगर पाहण्याचे निसर्गरम्य चित्र पाहण्यास खूप आनंद वाटतो शेजारीच माळवी पिंपळगाव चा तलाव आहे खूप रमणीय दृश्य निसर्गाने भरभरून दिलेले दान पाहून डोळ्याचे पारणे फिटते निसर्गाचा अद्भुत नजराणा काय असतो हे जर पाहिजे असेल तर टेंभीच्या खंडोबाला एकदा निश्चित भेट द्या जीवनात निसर्गाचा सहवास हा पाहिजेच जीवनात भौतिक सुखापेक्षा नैसर्गिक निसर्गाचा आनंद खूप आगळावेगळा असतो आज खंडोबाच्या दर्शनाला गेल्यावर मनातील आठवणी भावना गहिवरून आल्या ते आपल्या समोर शेअर केल्या आहे आपण एकदा तरी टेंभीच्या खंडोबाला दर्शनासाठी या
Post a Comment